For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चौकाला मिळाले भाजीचे नाव

07:00 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
चौकाला मिळाले भाजीचे नाव
Advertisement

भारत स्वत:ची वैविध्यपूर्ण संस्कृती, आहार आणि नैसर्गिक संपदेसाठी पूर्ण जगात ओळखला जाताहे. देशाच्या विविध राज्यांमध्ये अशा अनेक पारंपरिक गोष्टी पहायला मिळतात, ज्या स्थानिक लोकांच्या जीवनाचा हिस्सा असण्यासोबत स्वत:ची अनोखी ओळख राखून आहेत. यात हिमाचल प्रदेशातील एक खास रानभाजी लिंगडू सामील आहे. या भाजीची लोकप्रियता इतकी अधिक आहे की हिमाचल प्रदेशात एका चौकाचे नाव लिंगडू ठेवण्यात आले आहे. सोशल मीडियावर या चौकाचे छायाचित्र समोर येताच लोकांदरम्यान हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Advertisement

काय आहे लिंगडू

लिंगडू एक जंगली फर्नची कोमल फांदी आहे, ज्याला हिमालयीन क्षेत्रांमध्ये नैसर्गिक स्वरुपात उगताना पाहिले जाते.. ही सामान्य शेतीयुक्त भाजी नाही. याला शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात उगविले जाऊ शकत नाही, तर हे जंगल, पर्वतीय उतार आणि आर्द्रतायुक्त भागांमध्ये आपोआप उगवते. याच्या कोमल फांद्या तोडून भाजी केली जाते, स्थानिक लोक याला स्वादिष्ट असण्यासोबत पौष्टिकही मानतात.

Advertisement

अत्यंत कठिण परिस्थितींमध्ये उपलब्ध

लिंगडूचे सर्वात मोठे वैशिष्ट्या हे सर्व ठिकाणी मिळत नाही. केवळ उंच पर्वतीय भाग, जंगल आणि आर्द्रतायुक्त क्षेत्रांमध्ये उगवते. लिंगडू एकत्र करण्यासाठी लोकांना अनेक किलोमीटरपर्यंत दुर्गम मार्गांवर पायी चालावे लागते. पावसाळा आणि वसंत ऋतू लिंगडू तोडण्यासाठी सर्वात उपयुक्त मानला जातो. त्यानंतर याच्या फांद्या टणक होतात आणि खाण्यायोग्य राहत नाहीत.

स्वाद अन् पोषणाचा अनोखा मेळ

स्थानिक लोकांनुसार लिंगडूचा स्वाद सामान्य हिरव्या भाज्यांपेक्षा वेगळा असतो. याला मसाल्यांसोबत भाजून, उकळवून किंवा लोणच्याच्या रुपात खाल्ले जाते. परंतु याच्या पोषणसंबंधी दाव्यांवर वेगवेगळी अध्ययनं उपलब्ध आहेत. पारंपरिक स्वरुपात याला पौष्टिक जंगली खाद्य पदार्थ मानण्यात येते. पर्वतीय क्षेत्रांमध्ये हे दीर्घकाळापासून स्थानिक भोजनाचा हिस्सा राहिले आहे. हिमाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये लिंगडू स्थानिक ओळखीचे प्रतीक ठरले आहे. याचमुळे एका प्रमुख चौकाचे नाव लिंगडू चौक ठेवण्यात आले आहे. हे नाव क्षेत्राच्या सांस्कृतिक आणि खाद्यवारशाला दर्शवित असल्याचे स्थानिक लोकांचे मानणे आहे.

Advertisement
Tags :

.