For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंतराळ संस्थेने शेअर केले रामसेतूचे छायाचित्र

06:41 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
अंतराळ संस्थेने शेअर केले रामसेतूचे छायाचित्र
Advertisement

वृत्तसंस्था/ ब्रसेल्स

Advertisement

युरोपीय अंतराळ संस्थेने उपग्रहाद्वारे काढण्यात आलेले रामसेतूचे छायाचित्र शेअर केले आहे. हे छायाचित्र सेंटिनल-2 या उपग्रहाद्वारे मिळविण्यात आले आहे. या छायाचित्रात रामसेतू तामिळनाडूच्या रामेश्वरमपासून श्रीलंकेच्या मन्नार बेटापर्यंत फैलावलेला असल्याचे दिसून येते. याला अॅडम ब्रिज या नावाने देखील ओळखले जाते. पौराणिक ग्रंथांनुसार रामसेतूची निर्मिती भगवान रामाने वानरसेनेच्या मदतीने केली होती.

15 व्या शतकापर्यंत रामसेतू चालण्यायोग्य स्थितीत होता. परंतु नंतर सागरी वादळांमुळे ठिकठिकाणी त्याचे नुकसान झाले असे युरोपीय अंतराळ संस्थेकडून नमूद करण्यात आले आहे. रामसेतू भारताच्या रामेश्वरमपासून श्रीलंकेच्या मन्नार बेटादरम्यान अस्तित्वात आहे. याची लांबी सुमारे 48 किलोमीटर इतकी आहे.

Advertisement

सेतुसमुद्रम प्रकल्पासाठी काँग्रेस सरकारच्या काळात या सेतूचे काही हिस्से तोडण्याचा प्रस्ताव होता. परंतु देशभरातून तीव्र विरोध झाल्याने काँग्रेस सरकारला हा प्रकल्प राबवित आला नव्हता. रामसेतूनजीकच्या सागरी सृष्टीत डॉल्फिन, डुगोंग आणि कासव हे प्राणी दिसून येतात. चालू वर्षीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामसेतूचा प्रारंभिक बिंदू अरिचल मुनाईचा दौरा केला होता.

Advertisement
Tags :

.