उचगाव परिसरात धनगरी ढोल-ताशांचा गजर
मार्कंडेय तीर्थक्षेत्रावर ‘गणपती बाप्पा मोरया पुढल्या वषी लवकर या’चा जयघोष : रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका
वार्ताहर/उचगाव
उचगाव परिसरामध्ये मंगळवार दि. 17 सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ढोल, ताशे, धनगरी ढोल आणि भंडाऱ्याची उधळण करत युवक, पुऊष, महिला व युवती यांच्यासह ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वषी लवकर या’ गजरामध्ये रात्री उशिरा सार्वजनिक गणपती बाप्पांना अकरा दिवसाच्या उत्सवानंतर अखेरचा निरोप देण्यात आला. सर्वांचा उत्साह ओसंडून निघत होता. गुलालाची आणि भंडाऱ्याची उधळण, फटाक्मयांची आतषबाजी करत या भव्य मिरवणुका गावोगावी, गल्लोगल्लीमधून, निघून विसर्जनाच्या स्थळी पोहोचत असल्याचे चित्र रात्री दीड-दोन पर्यंत दिसून आले..
उचगाव, बसुर्ते, कल्लेहोळ, सुळगा, तुरमुरी, बाची गावातील घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत होते. अनेक गावांतून तलाव व विहिरीतून तसेच नागरिकांच्या स्वत:च्या विहिरीमधून गणपती बाप्पांना निरोप देऊन विसर्जनाची लगबग सर्वत्र दिसून येत होती. या भागात यावषी शांततेत व मंगलमय वातावरणात गणेशोत्सव साजरा झाला. चालूवषीच्या गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये डॉल्बीला फाटा देण्यात आल्याचेही चित्र अनेक ठिकाणी दिसून आले. ग्रा. पं.कडून तलावामध्ये व्रेनची व्यवस्था व तलावाच्या ठिकाणी विद्युत लाईटची व्यवस्थाही करण्यात आली होती.