महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पत्नीला नांदायला पाठवत नसल्याने जावयाचा सासऱ्यावर कोयत्याने हल्ला

03:05 PM Aug 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ऑटोनगर येथील घटनेने खळबळ : माळमारुती पोलिसांकडून जावयाला अटक 

Advertisement

बेळगाव : आपल्या पत्नीला नांदायला पाठवून दिले नाही म्हणून जावयाने सासऱ्यावर कोयत्याने हल्ला केला आहे. सोमवारी सकाळी ऑटोनगर येथे ही घटना घडली असून माळमारुती पोलिसांनी जावयाला अटक केली आहे. लगमण्णा यल्लाप्पा पुजेरी (वय 56) रा. ऑटोनगर असे जखमीचे नाव असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. लगमण्णाचा जावई कुबेर निंगाप्पा सत्यनायक (वय 38) मूळचा रा. मरडीमठ, ता. गोकाक, सध्या रा. सिद्धेश्वरनगर याने हे कृत्य केले आहे. घटनेची माहिती समजताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक व्हन्नाप्पा तळवार आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी कुबेर सत्यनायक याला अटक करून येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयासमोर हजर केले असून न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

Advertisement

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लगमण्णा यांची मुलगी कविता सध्या माहेरी आहे. पती कुबेर नशेत मारहाण करतो म्हणून लगमण्णा यांनी आपल्या मुलीला माहेरी घेऊन आले आहेत. कविताला नांदायला पाठवून द्या, अशी विचारणा करीत कुबेर रविवारी रात्री लगमण्णा यांच्या घरी पोहोचला होता. त्यावेळी त्याच्याजवळ कोयता होता. त्याची अवस्था बघून लगमण्णा यांनी रविवारी रात्री मुलीला पाठवले नाही. सोमवार दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता ऑटोनगर येथील एका पानशॉपजवळ लगमण्णा उभे होते. त्यावेळी जावयाने अर्वाच्च शिवीगाळ करीत त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला आहे. पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article