पाकिस्तानातील ‘सोलर किड्स’
बर्फासारखे थंड पडते शरीर, पुन्हा सकाळी होतात जिवंत
जगात अशी अनेक वैद्यकीय उदाहरणं आहेत, जी विज्ञान आणि डॉक्टरांसाठी देखील कोडं ठरतात. असेच एक चकित करणारे उदाहरण पाकिस्तानातून समोर आले आहे. जेथे दोन भावांच्या अनोख्या स्थितीने प्रत्येकाला हैराण केले आहे. या मुलांना लोक ‘सोलर किड्स’ नावाने ओळखतात, कारण त्यांचे जीवन सूर्यप्रकाशावर निर्भर असल्याचे दिसून येते.
हे दोन्ही भाऊ दिवसा अत्यंत सामान्य मुलांप्रमाणे राहतात, ते खेळतात, शिकतात आणि स्वत:ची सर्व कामे स्वत:च करतात, परंतु रात्र होताच त्यांची स्थिती अचानक बदलून जाते. त्यांचे शरीर जणू निर्जीव होते, ते हलू शकत नाही आणि शरीराचे तापमानही अत्यंत खालावते. ही स्थिती जणू एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यासारखी असते. दोन्ही भावांवर वैद्यकीय पथक संशोधन करत आहे.
सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे सकाळ होताच ही दोन्ही मुले पुन्हा सामान्य होतात, जसे काहीच घडले नसावे. ते पुन्हा सक्रीय होतात आणि स्वत:चा दिवस सामान्यपणे घालवतात. या अजब चक्राने सामान्य लोकांनाच नव्हे तर वैद्यकीय तज्ञांनाही कोड्यात पाडल आहे. डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी या प्रकरणाची विस्तृत तपासणी सुरू केली आहे. प्रारंभिक तपासणीत हा काही सामान्य आजार नव्हे तर एक दुर्लभ स्थिती असू शकते, जी शरीराचे मेटाबॉलिज्म किंवा नर्वस सिस्टीमशी संबंधित असू शकते असे मानले गेले आहे. परंतु यामागील अचूक कारण अद्याप कळू शकलेले नाही.
ही समस्या ऊर्जेच्या स्तरामध्ये अचानक घट होण्याशी संबंधित असू शकते असे काही तज्ञांचे मानणे आहे. दिवसाच्या वेळी शरीराला पुरेशी ऊर्जा प्राप्त होते, परंतु रात्र होताच ही ऊर्जा समाप्त होते, ज्यामुळे शरीर निष्क्रीयसारखे होते. तर काही अन्य तज्ञ याला एक जेनेटिक किंवा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर मानतात.
होतेय संशोधन
या प्रकरणावरून वैद्यकीय संशोधनही जारी आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संस्था यावर नजर ठेवुन आहेत आणि हे प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जर या रहस्याची उकल झाली तर हे वैद्यकीय शास्त्रासाठी एक मोठी कामगिरी ठरू शकते. सोशल मीडियावर या मुलांची कहाणी वेगाने व्हायरल होत आहे. लोक याला चमत्कार, रहस्य आणि विज्ञानाचा अनोखा मेळ ठरवत आहेत. काही लोक याला भीतीदायक मानतात, तर काही जण याला एक प्रेरणादायक कहाणीच्या रुपात पाहत आहेत.