For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समाजाला ड्रग्सच्या किडीने पोखरलंय !

03:48 PM Nov 19, 2023 IST | अनुजा कुडतरकर
समाजाला ड्रग्सच्या किडीने पोखरलंय
Advertisement

सावंतवाडी येथे राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत माजी खा. ब्रिगे. सुधीर सावंत यांचे प्रतिपादन

Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

येणाऱ्या काळात देशापुढे ड्रग्सचे मोठे संकट आहे. ड्रग्सच्या किडीने समाज पोखरला जात आहे. ड्रग्सची कीड कोणाच्याही घरात शिरली तर ती बाहेर पडणे मुश्कील आहे. त्यामुळे ,ड्रग्सच्या या कीडीला रोखण्याचे काम शिक्षकांनी करावे असे आवाहन माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी रविवारी येथे केले. महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र यांच्यावतीने येथील पालिकेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे व गुणवंत शिक्षकांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटेश जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. शिवाजी पाटील, प्रदेश कोषाध्यक्ष गजेंद्र कानडे ,प्रदेश महासचिव राम येडते , शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी ,सैनिक पतसंस्थेचे महाव्यवस्थापक सुनील राऊळ व्यासपीठावर उपस्थित होते. सुधीर सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकात असणे आवश्यक आहे. त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केलेली आहे .मुख्यमंत्री ती मान्य करतील असे सांगून सावंत यांनी महिलांना सैन्यात समाविष्ट करावे यासाठी आपण प्रयत्न केले त्यामुळे आज महिला सैन्यात दिसत आहेत .ठिकठिकाणी सैनिक स्कूल स्थापन करण्याची गरज आहे. आरोग्य दूत मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीबाबत माहिती दिली .मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवा असे आवाहन त्यांनी केले. पुरुषोत्तम जिन्ने आणि गिरीश जाधव यांनी शिक्षणाचे खाजगीकरण होत आहे .त्यामुळे गरिबांना शिक्षण दुरापास्त होणार आहे .शिक्षणाचे खाजगीकरण रोखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.