For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्षेत्र प्रयाग येथील स्नानपर्व काळास उत्साहात सुरुवात

06:34 PM Jan 15, 2024 IST | Kalyani Amanagi
क्षेत्र प्रयाग येथील स्नानपर्व काळास उत्साहात सुरुवात
Advertisement

प्रयाग चिखली प्रतिनिधी

Advertisement

करवीर काशी श्रीक्षेत्र "प्रयाग" (चिखली) येथील पंचगंगेच्या मूळ संगमावर सोमवारी सकाळी ७ वाजून १७ मिनिटापासून स्नान महापुण्यपूर्वकाळास सुरुवात झाली या योगावर कोल्हापूर परिसरातील शेकडो भाविकांनी येथील संगमावरील स्नान व दर्शनाचा लाभ घेण्यासाठी गर्दी केली होती.सोमवारी सकाळी सात वाजले पासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत गंगेवरील स्नानासाठीचा हा महापुण्यपूर्वकाळ होता. त्यानंतर पुढे एक महिना हा स्नान पर्वकाळ चालू राहणार आहे वारकरी तसेच भाविक भक्तांसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे त्या दरम्यान सुमारे महिनाभर म्हणजे 14 फेब्रुवारी पर्यंत या ठिकाणी मोठी यात्रा भरणार आहे.

करवीर काशी सारख्या पौराणिक ग्रंथांमध्ये दक्षिण काशी क्षेत्र प्रयाग या क्षेत्राचा पुण्य- पावन भूमी म्हणून उल्लेख आलेला आहे. येथील स्नान पर्व काळाला हजारो वर्षाचा पौराणिक संदर्भ आहे. महामुनी अगस्त ऋषी आणि लोपामुद्रा या दांपत्याने या क्षेत्राची निर्मिती केली असल्याचा उल्लेख अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये आला आहे. सूर्य मकर राशि प्रवेश करताना मकर संक्रांति पासून पुढे एक महिना या ठिकाणी स्नान पर्व का सुरू होतो महिन्याभरात या ठिकाणी मोठी प्रयाग यात्रा भरते. भाविकांपासून पर्यटकांपर्यंत लहानग्यापासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच या प्रयाग यात्रेचे औत्सुक्य असते.

Advertisement

सालाबाद प्रमाणे सात वाजता दत्तात्रयांची पालखी संगमावर गेल्यानंतर संगम स्थाने श्री दत्तात्रयांच्या मूर्तीला पंचगंगेच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. त्यानंतर पालखीतून दत्तात्रयांची मिरवणूक काढण्यात आली . या ठिकाणी असलेल्या संगमेश्वर,कार्तिक स्वामी, गिरीबुवांची समाधी, वटवृक्ष , वेणी माधव अशी अशी अनेक स्थाने आहेत या स्थानांना भेट देऊन पालखी मंदिरात गेली यावेळी आरती होऊन दर्शनाची सुरुवात झाली दरम्यान मंदिरामधी पूजा-विधी श्रीमती सावित्री गिरी अभिनव गिरी महंत समाधान गिरी यांनी पूर्ण केले.

या ठिकाणच्या मंदिरामध्ये दररोज सकाळी काकड आरती महा अभिषेक दुपारी बारा वाजता आरती व सायंकाळची आरती, याबरोबरच एक महिनाभर दररोज भजन, प्रवचन, गुरुचरित्र वाचन नाम जप महाप्रसाद असे विविध आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या ठिकाणी मोठी यात्रा भरली असून विविध खेळण्याचे स्टॉल खाण्यापिण्याचे स्टॉल , पाळणे प्रसादाचे स्टॉल लावण्यात आले असून पर्यटकांनाही आकर्षित वातावरण निर्मिती झाली आहे.

यापुढे एक महिन्यांमध्ये या ठिकाणी स्नान व दर्शनासाठी कोल्हापूर सांगली सातारा पुणे विभागातून हजारो लोक भाविक येणार असून त्यांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने क्षेत्र प्रयाग येथे सुविधा आणि सुरक्षा पुरवाव्यात अशी मागणी भाविकातून होत आहे.दरम्यान आज दिवसभरात शेकडो भाविकांनी संगमावर स्नान व दर्शनाचा लाभ घेतला यापुढेही एक महिनाभर भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन येथील पुजारी गिरी गोसावी कुटुंबियांनी केले आहे

Advertisement
Tags :

.