For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तस्करांचा अचंबित करणारा कट

06:25 AM Aug 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
तस्करांचा अचंबित करणारा कट
Advertisement

मांजराच्या गळ्यात बांधले ड्रग्ज

Advertisement

ड्रग्जची तस्करी रोखण्यासाठी पोलीस ड्रोन, पार्सल आणि वाहनांवर नजर ठेवतात, परंतु एखादा तस्कर एका मांजरालाच स्वत:चे कूरियर करत असेल तर. रशियात एक असेच धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. तेथे कैद्यांपर्यत अमली पदार्थ पोहोचविण्यासाठी मांजराच्या गळ्यात ड्रग्ज बांधून त्याला तुरुंगात पाठविले जात होते. मांजरावर कुणीच संशय घेणार नाही असे तस्करांना वाटत होते, परंतु तुरुंग अधिकाऱ्यांच्या एका छोट्या नजरेने त्यांचा पूर्ण कट उधळला गेला. हे प्रकरण रशियाच्या निजनी नोवगोरोद शहरातील करेक्शनल कॉलनी क्रमांक 17 मधील आहे. तुरुंगाच्या सुरक्षारक्षकांची नजर एका मांजरावर पडली, जे तुरुंगाच्या दिशेने येत होते. पहिल्या नजरेत हे सामान्य भटके मांजर वाटत होते, परंतु अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे बारकाईने पाहिल्यावर त्याच्या गळ्यात कपड्याने निर्मित दोन वेगवेगळे कॉलर बांधलेले दिसून आले. हीच गोष्ट सुरक्षारक्षकांना संशयास्पद वाटली.

कॉलरमध्ये दडले होते रहस्य

Advertisement

अधिकाऱ्यांनी या मांजराला पकडून त्याच्या गळ्यातील दोन कॉलर उतरविले. त्यांची तपासणी करण्यात आलीअसता आता प्रतिबंधित अमली पदार्थ मिळाले. यानंतर घटनास्थळी स्निफर डॉगला पाचारण करण्यात आले. तपासणीत कॉलरमध्ये ड्रग्ज लपविण्यात आले होते, याची पुष्टी झाली. हे ड्रग्ज तुरुंगातील कैद्यांपर्यंत पोहोचविण्याची योजना आखण्यात आली होती. एका मांजरावर कुणाला संशय येणार नाही असे तस्करांचे मानणे असावे. मांजर सहजपणे भिंती, झुडुपं आणि छोट्या जागांमधून बाहेर पडत तुरुंग परिसरापर्यंत पोहोचू शकतात. याचमुळे ड्रग्ज पोहोचविण्यासाठी मांजराचा वापर करण्यात आला. परंतु तुरुंगाची सुरक्षाव्यवस्था आणि कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे.

मांजर सुरक्षित

ड्रग्ज हस्तगत करण्यात आल्यावर मांजर पूर्णपणे सुरक्षित असून त्याला कुठलीच ईजा पोहोचलेली नाही. आरोग्य तपासणीनंतर त्याला सोडून देण्यात आल्याचे रशियाच्या फेडरल पेनिटेंशरी सर्व्हिसने सांगितले. मांजराचा या पूर्ण प्रकरणात कुठलाच दोष नव्हता, तस्करांनी स्वत:च्या फायद्यासाठी मांजराचा वापर केला होता, असे अधिकाऱ्यांचे सांगणे आहे. ड्रग्ज हस्तगत झाल्यावर पोलीस आणि तुरुंग प्रशासन आता मांजराद्वारे अमली पदार्थ पाठविण्यामागे कोण लोक होते, याचा तपास करत आहेत. मांजराच्या गळ्यात कॉलर कोणी बांधले आणि तुरुंगाच्या आत ड्रग्ज कुठल्या कैद्यापर्यंत पोहोचविले जाणार होते, याचाही शोध घेण्यात येणार आहे.

पूर्वीही प्राण्यांचा वापर

अनेक देशांमध्ये यापूर्वीही गुन्हेगारांनी प्राण्यांचा तस्करीसाठी वापर केला आहे. कधी कबुतरांद्वारे मोबाइल फोन आणि छोटी सामग्री तुरुंगापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न झाला. प्राण्यांचा वापर प्रतिबंधित सामग्री नेण्यासाठी करण्यात आला होता. परंतु मांजराद्वारे ड्रग्ज पाठविण्याची ही घटना गुन्हेगार नव्या पद्धती अवलंबिण्यास मागे राहत नसल्याचे दाखवून देते. या प्रकरणी लोकांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

अनेक लोक याला एखाद्या फिल्मी कहाणीसारखे ठरवत आहेत. तर गुन्हेगार आता सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी कुठल्याही थरावर जाऊ शकतात असे काही लोकांचे सांगणे आहे. अनेक युजर्स मांजराला कुठलेच नुकसान पोहोचल्याने आनंद व्यक्त करत आहेत.

Advertisement
Tags :

.