For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापूरातून शिकारीसाठी आलेल्यांच्या मुसक्या आवळल्या

02:17 PM Jun 18, 2026 IST | अनुजा कुडतरकर
कोल्हापूरातून शिकारीसाठी आलेल्यांच्या मुसक्या आवळल्या
Advertisement

त.भा. वार्ताहर

Advertisement

आंबोली -चौकुळ चुरणीची मूस आणि शिरगांवकर पाँईट येथे आंबोली वन विभागाने मोठी कारवाई केली आहे . कोल्हापूर येथून आंबोलीत शिकारीसाठी आलेल्या अकरा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे .गस्ती दरम्यान एक साळींदर , एक पिसई आणि एक कटींदरसह दोन बंदूका, काडतूस जप्त करण्यात आल्या . ही कारवाई बुधवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास ए.सी.एफ.वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने केली . दरम्यान ,संशयित आरोपी स्थानिकांच्या मदतीने जंगलात शिकारीला फिरत असल्याची माहिती समोर आली आहे . आंबोली, चौकुळ परिसरातील जंगलात वारंवार बाहेरच्या लोकांकडूनच स्थानिकांचा वापर करून
शिकारीचा प्रयत्न होत असतो त्यामुळे अशा शिकारीला आळा घालण्याचे आव्हान वनविभागसमोर असते . भररात्री केलेल्या या कारवाईमुळे सर्वच स्तरातून वन विभागाच्या कारवाईचे कौतुक होत आहे .

Advertisement

Advertisement
Tags :

.