HelwakVillage | कष्टाची गिरण अन यशाचा 'खाकी' गंध! हेळवाकच्या शिंदे कुटुंबातील ४ मुले पोलीस दलात दाखल
हेळवाकच्या शिंदे दाम्पत्याचा आदर्श
कोयनानगर( विलास कदम )- ग्रामीण भागात असलेल्या हेळवाक (ता. पाटण) येथे पिठाची गिरणी चालवून सीमा शिंदे व भीमराव शिंदे या दाम्पत्याने आपल्या तीन मुली व एका मुलाला पोलीस खात्यात भरती करून लोकसेवक बनवत एक आदर्श निर्माण केला आहे.
आजारपण बाजूला सारून ध्येय साध्य करण्याची धडपड हेळवाक गावातील भीमराम शिंदे या कुटुंबाने दाखवून दिली आहे. जिद्धीने आपल्या तीन मुली व एका मुलास पोलीस खात्यात भरती करण्याचे धाडस केले आहे. त्यांच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. भीमराव शिंदे यांचा पूर्वीपासूनच पिठाची गिरणी चालवण्याचा व्यवसायआहे, त्यांची वेळोवेळी बिघडत असणारी तब्बेत पाहून त्यांची पत्नी सीमा शिंदे यांनी स्वतः गिरण चालवण्याचा निर्णय घेतला. पिठाची गिरणी चालवणे सोपे नसते. नाकातोंडात पीठ जाते. त्यामुळे तब्बेत बिघडू शकते. श्वसनाचा त्रास होऊ शकतो. तरीही त्यांनी गिरण चालवून रुपाली, सोनाली व वैभवी या तीन मुलींना व रणजितसिंह या मुलाला पोलीस खात्यात भरती केले आहे. त्यांनी केलेल्या कष्टातून आपल्या मुलांना योग्य पद्धतीने घडवले.
हेळवाक गावात नेहमी होणारे वादविवाद, भांडण, तंटे, मारामाऱ्या यामुळे हेळवाक गावचे नाव संवेदनशीलच्या यादीत आहे. तशी पोलीस ठाण्यात नोंद आहे. अशा परिस्थितीत पाच मुलांना सांभाळणे सोपे नसतानाही केवळ कष्टावर विश्वास ठेवत पाच पैकी चार मुलांना पोलीस खात्यात भरती करणे ही केवळ कष्टाचीच पोचपावती आहे.शिंदे कुटुंबीयांनी नेहमीच कष्टाला प्राधान्य दिले आहे. चार मुलांना पोलीस सेवेत पाठवले आहे ही गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या मुलांचा आदर्श घेऊन इतर मुलेही
तरुण पिढी बाचायी
गावात सतत होणारे भांडण तट, मारामाऱ्या यामुळे गावातील वातावरण दूषित होऊन तरुण पिढी बरबाद होत आहे. जिद्धीने मी मुलांना पोलीस खात्यात भरती केले. इतरांनी तसेच करावे.
सीमा शिदि, आई
अभिमानारयद गोष्ट
माझ्या तीन मुलींना व एका मुलाला पोलीस भरती करण्यात माझी पत्नी सीमा हिचा सिंहाचा वाटा आहे. तिने कष्ट व मेहनत करत मुलांना लोकसेवेसाठी सक्षम बनविलेआहे, ही अभिमानाची गोष्ट आहे भीमराव शिदि, वडील
भरती होतील, असे सरपंच गजानन कदम यांनी सांगितले.
एकाच घरात चार गणवेश
रुपाली शिंदे : मुंबई रेल्वे पोलीस
सोनाली शिंदे : सोलापूर ग्रामीण पोलीस
वैभवी शिंदे : मुंबई रेल्वे पोलीस
रणजितसिंह शिंदे : ठाणे शहर पोलीस