जगातील सर्वात छोटा पार्क
गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने दिली माहिती
पार्क म्हणजेच उद्यानाचे नाव ऐकताच मुलांपासून प्रौढांच्या डोळ्यासमोर एक चित्र उभे राहते. ज्यात काही झोपाळे अन् पायी चालता येईल अशी वाट अन् बेंच दिसून येते. परंतु जपानमध्ये असलेल्या जगातील सर्वात छोट्या पार्कने स्वत:चे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नेंदविण्याची कामगिरी केली आहे. जगातील सर्वात छोटा पार्क केवळ 0.24 चौरस मीटर आकाराचे आहे. हे पार्क जपानच्या शिजुओका येथील नागाइजुमी शहरात आहे. गिनिज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर याचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो ह्यूज प्राप्त झाल्या आहेत. हे पार्क 1988 मध्ये साकारण्यात आले होते.
हे पार्क ए3च्या 2 पानांइतके मोठे आहे. या पार्कमध्ये एक एंट्री गेट, बेंच आणि गवत आहे. या गवतांदरम्यान काही रोपांची लागवड करण्यात आल्याचे एक इसम सांगत असल्याचे या व्हिडिओत दिसून येते. या छोट्या पार्कचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद पाहून युजर्स अवाक् झाले आहेत. आम्हाला पार्कची व्याख्या जाणून घेण्यासाठी संशोधन करावे लागेल अशी उपरोधिक टिप्पणी एका युजरने केली आहे.