सर्वात छोटी सीमा
गल्लीपेक्षाही कमी असणार लांबी
जगात अनेक देश असून त्यातील प्रत्येकाचे असे वैशिष्ट्या आहे. काही देशांचे क्षेत्रफळ अधिक असते तर काहींचे कमी. काही देशांच्या सीमा अत्यंत लांब असतात तर काही देशांच्या सीमा अनेक देशांना लागून असतात. परंतु एक सीमा सर्वात छोटी आहे. याची लांबी अन् रुंदी जाणून घेतल्यावर इतकी छोटी सीमा असू शकते यावर विश्वासच बसणार नाही.
स्पेन स्वत:चे सौंदर्य आणि समृद्ध संस्कृतीसाठी ओळखला जातो. परंतु सर्वात छोटी सीमा याच देशामध्ये आहे. स्पेन सुमारे 2 हजार किलोमीटर लांब सीमा पोर्तुगाल आणि फ्रान्ससोबत शेअर करतो. परंतु या देशाची एक सीमा अत्यंत छोटी असून त्याची तुलना गल्लीशी केली जाऊ शकते. एंडोरा युनायटेड किंगडमच्या जिब्राल्टर आणि मोरक्कोला लागून असणारी याची सीमा अत्यंत छोटी आहे. स्पेनची सर्वात छोटी सीमा 85 मीटर लांब असून ती एका 19 हजार चौरस मीटरच्या एका खडकाशी जोडलेली असून तो मोरक्कन किनाऱ्याशी मिळतो. याला जगातील सर्वात छोटी सीमा मानण्यात येते.
पेनॉन डे वेलेझ डे ला गोमेरा स्पेनच्या सीमाक्षेत्रात 1564 पासून आहे. हा भूभाग अॅडमिरल पेड्रो यांनी जिंकला होता. परंतु मोरक्को या भूभागावर स्वत:चा दावा सांगत आहे, पण स्पेनने हा भूभाग कधीच परत केलेला नाही. येथे रितसर स्पॅनिश सैनिक रक्षण करत आहेत. पेनॉन दि वेलेझ दि ला गोमेरा नावाच्या या खडकाला 1934 पर्यंत एक बेट मानले जात होते, परंतु भूकंपानंतर हे पेनिनसुलामध्ये रुपांतरित झाले.