सर्वात छोटे घर
किचन, बेडरुम सर्वकाही यात
जगातील सर्वात छोटे घर तुम्ही कधी पाहिले आहे का? 20 चौरस फुटापेक्षा कमी आकाराचे एक घर असून यात बेडरुम, किचन, टॉयलेट सर्वकाही आहे. यात केवळ एकच इसम शिरू शकतो, असे ते पाहिल्यावर वाटते. युट्यूबर लेवी कॅलीने याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
हे घर केवळ 19.46 चौरस फूट म्हणजेच 1.8 चौरस मीटर आकाराचे आहे. याचबरोबर हे जगातील सर्वात छोटे घर असूनही यात आधुनिक फ्लॅटच्या सर्व सुविधा आहेत. अमेरिकेच्या लेवी कॅलीचे हे घर दूरून एका टेलिफोन बूथसारखे दिसते.
हे घर केवळ एकाच एक्सलच्या चाकांवर आहे. यात बसण्याची जागा, बेड, किचन आणि टॉयलेट देखील आहे. या घराच्या निर्मितीत लेवीला केवळ 21 हजार 500 रुपयांचा खर्च आला आहे. यात स्पेस रीडिंग, कुलिंग युनिटसोबत वॉटर टँक, वॉटर हीटर, फील्टर आणि पंप सिस्टीम देखील आहे. याचबरोबर एक मिनी फ्रीज, इलेक्ट्रिक कूक टॉप देखील यात आहे. यात केवळ एक प्रौढ व्यक्ती आरामात उभा राहू शकतो आणि झोपू शकतो असे लेवीचे सांगणे आहे. यात कॅम्पिंग स्टाइलचे टॉयलेट असून घराबाहेर शॉवर लावण्यात आला आहे.