महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘गरज सरो, वैद्य मरो’ चा नारा

06:35 AM Feb 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कार्यार्थी भजते लोकं यावत्कार्य न सिद्धति!

Advertisement

उत्तीर्णे च परे पारे नौकायां किं प्रयोजनम्।।

Advertisement

ज्या रितीने आपण नावेतून नदी पार केल्यावर नावेला विसरुन जातो, तिचा काय उपयोग असे समजतो, तसेच आपले काम पूर्ण होईपर्यंत आपण त्या मदत करणाऱ्या व्यक्तीची प्रशंसा करतो व काम झाले की आपण त्या मदत करणाऱ्या व्यक्तिला विसरुन जातो.

‘कामापुरता मामा ताकापुरती आजी’ ही लहानपणी शिकवलेली म्हण जेव्हा मोठे झाल्यानंतर वास्तवात जाणवायला लागते, त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्या म्हणीचा अर्थ प्रत्ययास येतो. मध्यंतरी एका आजोबांची कैफियत वर्तमानपत्रामध्ये आली होती. नातवंडं तीन-चार वर्षाची असेपर्यंत आजोबा आजींच्या मागे मागे असतात. नंतर जसजसं त्याचं क्षितिज विस्तारत जातं, तसतसं आजोबा त्याला नकोसे व्हायला लागतात. अशावेळी आता आपली त्याला काहीच गरज नाही हे लक्षात आल्यानंतर खरोखरच वाईट वाटतं. पण त्यावेळच्या गरजा आणि आत्ताची गरज यामध्ये फरक असतो हे लक्षात घ्यायला हवं. घरात आजी-आजोबा असणं हासुद्धा एक मानसिक आधार असतो. दर वेळेला काही काम केलं पाहिजे किंवा मदत केलीच पाहिजे असं नसतं. तरीही माणसाचा स्वभाव एकूणच स्वार्थी वृत्तीचा. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण लक्षात ठेवतो तसं नाही. त्या त्या वेळेपुरती त्यांची उपस्थिती असते. पण अशी अनुपस्थित असलेली माणसंसुद्धा कधीतरी आपल्याला खूप उपयोगाची ठरली होती याची जाणीव मात्र प्रत्येकाने ठेवायला हवी. लहानपणी मदत करणारे आजी, आजोबा, काका, काकू, ताई, दादा, मामा, मावशी, आत्या इ. आता जरी आपण कर्तृत्वत्वान झालो असलो तरी त्यांचाही आपल्या आयुष्यात कुठेतरी एक छोटासा सहभाग होता, याची जाणीवतरी नक्की ठेवावी. पण आपण मोठे झालो, पैसे मिळवायला लागलो की ह्या सगळ्या गोष्टींना आपण पैशाने मोजायला लागतो. मग गरीब शेजारी असतील किंवा एखादे व्यंग असलेली व्यक्ती असेल तर त्या सगळ्यांना आपण टाळण्याचाच प्रयत्न करतो. अशावेळी हे सुभाषित आपल्याला मनोमन पटते. आजकाल परदेशातून आलेली मुलं कशाला एवढे सगळे नातेवाईक बोलवायचे? मी आता कशाला कुणाकडे जाणार आहे? माझे या सगळ्यांशी काय संबंध राहणारेत? अशा अविर्भावानेच लग्नकार्यात किंवा भेटीसाठी न बोलावणारे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात. अशावेळी आई-वडिलांची मनस्थिती फार विचित्र होते. कारण त्यांना त्या लोकांशी संबंध ठेवायचे असतात आणि पुढच्या पिढीला मात्र ते संबंध नकोसे असतात. आज-काल म्हातारी माणसं नको, मूलबाळ नको, लग्नदेखील तात्पुरत्या स्वरूपाचेच हवे, म्हणजे एकूणच कुठलीही जबाबदारीच नको, अशा वृत्तीची पिढी जन्माला येत असताना कोणी कोणाबद्दल काय आदरभाव मनात बाळगतील असे मोठे प्रश्नचिन्ह आम्हाला सतत सतावत असतात. मनात येते आम्हीच या पिढीला शिकवायला कमी पडलो की काय? असा प्रश्नसुद्धा मनात येऊन जातोच. एक मात्र खरं ‘गरज सरो, वैद्य मरो’ असा अलिखित नियम असावा बहुतेक.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article