महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आकाश फाटले सारेच हतबल झाले

11:05 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रशासनाकडून केवळ पाहणी दौरा, जनता मात्र हताश, यापूर्वीच कामे केले असती तर पूर आला नसता

Advertisement

बेळगाव : निसर्गाचा रूद्र अवतार अनेकवेळा अनभुवला असला तरी त्याचे परिणाम सर्व सामान्य जनतेला अनेक वर्षे सहन करावे लागतात. काहीवेळा कोरडा दुष्काळ तर काही वेळा ओला दुष्काळाची मालीका शेतकऱ्यांबरोबर सर्व सामान्य जनतेला अनभुवाला मिळते. तसेच त्याचे परिणाम भोगायला सज्जच रहावे लागत आहे. मागील वर्षी कोरड्या दुष्काळाने पाणी, चारा, अन्न या समस्येने हैराण झालेल्या जनतेला यावर्षी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे निर्सगाचा सामना कसा करायचा असा प्रश्न आता पडला आहे. गेल्या आठ दिवसांपासून पाऊसाने अक्षरश: झोडपून काढले असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली असून ओल्या दुष्काळाची छाया आता गडद झाली आहे.

Advertisement

आकाश फाटले की काय अशाच प्रतिक्रिया आता उपटू लागल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये सकाळच्या सत्रात जोरदार पाऊस होता. त्या तुलनेत शहारामध्ये काहीसा पाऊस कमी होता मात्र दुपारनंतर शहरालाही पाऊसाने झोडपून काढले. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने साऱ्यांचीच तारांबळ उडाली. तळ घरांमध्ये तर पाणी साचून तलावाचे स्वरूप निर्माण झाले होते. त्यामुळे शहरातील संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले होते. फोर्ट रोड येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचून आले आहे. तर काही दुकानांमध्येही पाणी मोठ्याप्रमाणात जात होते. मात्र त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाण्याला जाण्यासाठी वाट मोकळी करून दिल्याने काही प्रमाणात साचून राहिलेले पाणी कमी झाले आहे.

पावसाचा जोर इतका होता की, बघताबघता सर्वत्र पाणीच पाणी होत होते. या जोरदार पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली, झाडे पडली. त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. गेल्या चार दिवसांपासूनच बळ्ळारी नाला, मार्कंडेय नदी यासह इतर नाल्यांना पूर आला होता. आता त्याचे रूपांतर महापुरामध्ये झाले आहे. त्यामुळे हजारो एकर जमीनीतील पिके वाया गेली असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आता आली आहे.

शुक्रवारी पहाटे जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर सकाळी 9 पासून पावसाचा जोर कमी होता. दुपारी 2 नंतर मात्र पुन्हा पावसाचा जोर वाढला. त्यामुळे अनेक रस्त्यांवर तसेच घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे त्यांची तारांबळ उडाली. महानगरपालिकेने गटारींचे काम योग्य प्रकारे केले नाही परिणामी अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले. पाण्याला जाण्यासाठी पुढे वाटच नसल्याने अनेक ठिकाणी घुडघाभरपेक्षा अधिक पाणी साचून होते. या पावसामुळे झाडे कोसळली होती. याचबरोबर काही भागामध्ये विद्युत पुरवठाही खंडीत झाला होता.

शहरातील अनेक शाळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून आहे. त्याचबरोबर इमारतींना गळतीही लागली आहे. दमदार पावसामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली असली तरी शाळेच्या परिसरात मात्र मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले आहे. ते पाणी काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. पाण्याला जाण्यासाठी वाटच नसल्याने अनेक ठिकाणी चरी खणून पाणी काढावे लागत आहे. शाळेचा परिसर चिखलमय बनला आहे.

बळ्ळारी नाला परिसराला पुराचा वेढा निर्माण झाला. हा नाला परिसर म्हणजे जनु जलाशयच असल्याचे दिसून येत आहे. येळ्ळूरपासून बसवनकुडचीपर्यंत तसेच हुदलीपर्यंत देखील शिवारामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचून आहे. या नाल्याची खोदाई करावी म्हणून जिल्हाधिकारी, महानगरपालिका, पाटबंधारे खाते, मंत्री या सर्वांचे उबंरठे झिजवले. मात्र याबाबत त्याचे कोणालाच गांभीर्य आले नाही. परिणामी आज बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. महानगरपालिका हा नाला पाटबंधारे खात्याकडे येतो असे सांगत आहे. मात्र महानगरपालिकेचे सांडपाणी आणि ड्रेनेजचे पाणी या नाल्यामध्ये सोडले जाते. मार्कंडेय नदीच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आहे. या नाल्यातील गाळ काढणे तसेच झालेले अतिक्रमण काढले असते तर हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली नसती.

जिल्हा प्रशासनाला आता जाग आली आणि पहाणी दौरा करू लागले आहेत. मात्र आता पहाणी करण्यापेक्षा उन्हाळ्यातच जर या समस्या सोडविल्या असत्या तर ही परिस्थिती उद्भवली नसती अशा तिकट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या पावसामुळे स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेल्या कामाचा दर्जा उघडकीस आला. शहरातील सर्वच रस्ते उखडून गेले आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचून आहे. एकूणच या पावसाने जिल्हा प्रशासनाची पोलखोल केली आहे. मात्र यामध्ये सर्व सामान्य जनता भरडून निघाली आहे.

अतिवृष्टीने बाजारपेठेवर परिणाम : वर्दळ थंडावली, उलाढाल मंदावली

मागील आठ, दहा दिवसांपासून सर्वत्र संततधार पावसाने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे त्याचा बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे. ग्राहकांची वर्दळ थंडावल्याने उलाढाल कमी झाली आहे. एरव्ही हजारो नागरिकांनी गजबजणाऱ्या बाजारपेठत शुकशुकाट पहावयास मिळत आहे. त्यामुळे अतिवृष्टीचा बाजारपेठेवरही परिणाम झाल्याचे दिसत आहे. पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने नदी, नाले आणि जलाशयांच्या पाणी पातळीत वाढ होऊन अनेक रस्त्यांवर पाणी आले आहे. शिवाय वाहतुकही ठप्प झाली आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. त्याबरोबर पावसाचा मारा कायम असल्याने बाजारपेठेतील वर्दळ कमी झाल्याचे दिसत आहे. दररोज बाजारपेठेत कोट्यावधी रूपयांची उलाढाल होते. मात्र अति पावसामुळे या उलाढालीवर परिणाम झाला आहे. बेळगाव बाजारपेठेत गोवा, खानापूर, चंदगड, आजरा इतर ठिकाणाहून येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. मात्र अतिपावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्याबरोबर अनेक मार्गावर परिवहनची बससेवाही थांबविण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article