For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

अस्थिपंजराची किंमत 450 कोटी

06:21 AM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
अस्थिपंजराची किंमत 450 कोटी
Advertisement

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील सोथबी लिलाव संस्थेमध्ये नुकताच एक लिलाव करण्यात आला आहे. हा लिलावातून 450 कोटी रुपयांची प्राप्ती झाली आहे. हा जगातील आतापर्यंतचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महाग लिलाव ठरला आहे. या लिलावात ‘नॅनोटायरेनस’ नामक प्रजातीच्या डायनासोरचा आहे. ही प्रजाती पृथ्वीवर कोट्यावधी वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. या अस्थिपंजराचे वय किमान सहा कोटी वर्षे आहे. या अस्थिपंजराचे नाव ‘जॉडी’ असे ठेवण्यात आले आहे. या लिलावात 6 धनिकांनी भाग घेतला होता. त्यांनी अत्यंत चुरशीने बोली वाढवत नेल्याने अंतिमत: या अस्थिपंजराची किंमत 4 कोटी 73 लाख डॉलर्स, अर्थात, जवळपास 450 कोटी रुपये इतकी निर्धारीत झाली. या किमतीला या डायनासोरची विक्री झाली. मात्र, या लिलावाला अनेक पुरातत्व शास्त्रज्ञांचा विरोध होता. डायनासोरचा अस्थिपंजर ही वैज्ञानिक संशोधनासाठी अत्यंत उपयुक्त वस्तू आहे. असे पूर्ण अवस्थेतले डायनासोरचे अस्थिपंजर अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. तेव्हा, शास्त्रीय संशोधनासाठी ते राखून ठेवणे आवश्यक आहे. अशा अस्थिपंजरांचे स्थान प्रयोगशाळा हे आहे. ते खासगी धनिकांच्या तिजोऱ्यांमध्ये बंद राहता कामा नयेत, असे या शास्त्रज्ञांचे आवाहन आहे. तथापि, या आवाहनाला न जुमानता हा लिलाव पार पडला. किंमत अपेक्षेपेक्षाही जवळपास 8 पट अधिक मिळाली. लिलावकर्त्यांची अपेक्षा साधारणत: 57 कोटी रुपये ते 89 कोटी रुपये इतकी येईल, अशी होती. तथापि, या अपेक्षाकृत किमतीच्या आठपट अधिक किंमत मिळाली. यावरुन खासगी व्यक्तींनाही अशा जीवाश्मांमध्ये किती स्वारस्य आहे, हे या घटनेवरुन दिसून आले आहे. ही लिलाव प्रक्रिया अवघ्या 12 मिनिटांमध्ये संपली. प्रथमपासूनच अपेक्षित किमतीच्या अधिकची बोली लागली होती. हा अस्थिपंजर पूर्ण नाही. त्याची काही हाडे कृत्रिमरित्या बनविण्यात आली आहेत, असे दिसून येते.

Advertisement

Advertisement
Tags :

.