महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जिल्ह्यात पशुसंगोपन खात्याची परिस्थिती बिकट

10:23 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

44 हजार जनावरांमागे एक पशुवैद्य : रिक्त पदांमुळे अतिरिक्त ताण : पशुपालकांना अपुऱ्या सुविधांचा फटका

Advertisement

बेळगाव : पशुसंगोपन खात्यात निम्म्याहून अधिक जागा रिक्त असल्याने जनावरांना आरोग्याच्या सुविधा पुरविताना अडचणी येऊ लागल्या आहेत. पशुपालकांना सुविधा आणि जनावरांना वेळेत उपचार मिळत नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील कित्येक वर्षांपासून रिक्त असलेल्या जागा भरण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पशुपालकांना खासगी डॉक्टरांकडूनच उपचार करून घ्यावे लागत आहेत. जिल्ह्यातील उपसंचालक, पशुवैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक आणि डी दर्जा कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे पशुवैद्य आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढू लागला आहे. विशेषत: पशुपालकांना सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यात 13.93 लाख मोठ्या जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या आदींचा समावेश आहे.

Advertisement

तर 14.50 लाख गाढव, डुकरे, कुत्री, मांजरे, घोडे आणि इतर प्राण्यांची संख्या आहे. राष्ट्रीय पशुधन विकास यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रत्येक 5 हजार जनावरांमागे एक पशुवैद्यकीय अधिकारी असणे आवश्यक आहे. मात्र, सद्यस्थितीत जिल्ह्यात 44,262 जनावरांमागे एक पशुवैद्य कार्यरत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पशुवैद्यकीयांची कमतरता जाणवू लागली आहे. इतकी गंभीर परिस्थिती असतानादेखील शासनाने रिक्त जागा भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. जिल्ह्यात 54 पशुवैद्यकीय अधिकारी, 4 मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी, 20 वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी, 354 डी ग्रुप कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. एकूण 1096 रिक्त जागा मंजूर करण्यात आल्या असून त्यापैकी 559 जागा भरण्यात आल्या आहेत. उर्वरित 537 जागा अद्याप रिक्त आहेत. त्यामुळे पशुसंगोपनचा कारभार डळमळीत होऊ लागला आहे.

कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार

पशुसंगोपन खात्यातील रिक्त जागा भरण्यात आल्या नसल्यामुळे सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. पावसाळ्याला सुरुवात झाल्याने जनावरांना विविध रोगांची लागण होते. त्यामुळे वेळेत उपचार देणेही आवश्यक आहे. मात्र, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. जिल्ह्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. सरकारने 400 जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. काही जागा कंत्राटी पद्धतीने भरण्याची तयारी चालविली आहे. खात्यात रिक्त जागा असल्या तरी जनावरापर्यंत उपचार पोहोचविले जात आहेत.

सुविधा पुरविताना अडचणी

जनावरांना कृत्रिम गर्भधारणा, अनुदान, आरोग्य शिबिरे, जनावरांचे प्रदर्शन, गणती, प्रतिबंधक लसीकरण आदी बाबी पुरविताना अडचणी येऊ लागल्या आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्यामुळे पशुपालकांच्या जनावरांना सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे येत्या काळात सरकार पशुसंगोपन खात्यातील रिक्त जागा भरणार का? हे पाहावे लागणार आहे.

- डॉ. राजीव कुलेर (सहसंचालक पशुसंगोपन खाते)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article