For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सहारा वाळवंटातील ‘सिल्वर’ मुंगी

07:00 AM Jun 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
सहारा वाळवंटातील ‘सिल्वर’ मुंगी
Advertisement

तापत्या वाळूत चालणारी मुंगी

Advertisement

जगातील सर्वात उष्ण वाळवंटातही काही जीव इतक्या सुंदरपणे अनुकूलित झाले आहेत की, त्यांना पाहून चकित व्हायला होते. सहारा वाळवंटातील ‘सिल्वर एंट’ किंवा चांदीयुक्त मुंगी याचपैकी एक आहे. ही मुंगी दिवसाच्या सर्वात उष्ण वेळेत, जेव्हा वाळूचे तापमान 70 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते, तेव्हा बाहेर पडत हिंडत असते. तर हवामान थंड होताच ही मुंगी त्वरित स्वत:च्या बिळात गायब होते. या मुंगीचे शास्त्राrय नाव कॅटग्लिसिस बॉम्बिसिना आहे. ही जगातील सर्वात वेगाने चालणारी मुंगी देखील आहे. ही मुंगी स्वत:च्या शरीराच्या लांबीपेक्षा 108 अधिक अंतर एका सेकंदात गाठत असते. म्हणजेच माणसाचा वेग याच गुणोत्तरात असेल तर आम्ही 700 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावत असू.

खास आहे याचा रंग

Advertisement

सिल्वर एंटचे सर्वात मोठे वैशिष्ट्या त्याच्या शरीरावरील चांदीसारखे सुक्ष्म केस आहेत. हे केस त्रिकोणी आकाराचे असतात, जे सूर्यप्रकाश आणि निकट इन्फ्रारेड किरणांना आकार देतात. यामुळे मुंगीचे शरीर तापत नाही, तसेच हे केस मिड-इन्फ्रारेड रेडिएशनला  बाहेर काढण्यासही मदत करतात. म्हणजेच मुंगी स्वत:ला थंड ठेवू शकते. वैज्ञानिकांनुसार हे केस मुंगीला 5 अंशांपर्यंत थंड ठेवू शकतात. ही मुंगी दिवसात केवळ 10-15 मिनिटांसाठीच बाहेर असते. यादरम्यान ती उष्णतेमुळे मृत्यू झालेल्या इतर किड्यांचे शरीर फस्त करते. इतक्या तप्त वातावरणात बाहेर पडण्याचा लाभ म्हणजे तिचे शिकारीही बाहेर पडलेले नसतात. लांब पाय असल्याने तिचे शरीर तप्त वाळूपासून वर राहते. यामुळे तिला उष्णता कमी जाणवते. याचे शरीर तापमान 53.6 अंश सेल्सिअसपर्यंत सुरक्षित राहू शकते. याहून अधिक तापमान झाल्यास ही मुंगी त्वरित बिळात परतत असल्याचे वैज्ञानिकांना आढळून आले.

Advertisement
Tags :

.