Kolhapur News : टोप-भोसलेखडी परिसरात गव्यांचा मुक्त संचार; शेतकऱ्यांमध्ये भीती
टोप परिसरात तीन गवे दिसल्याने शेतकरी भयभीत
टोप : टोप येथील बिरदेव मंदिर पाठीमागील क्रशरकडे डोंगरत जाणाऱ्या मार्गावर तीन गव्याचे दिसल्याने टोप भोसले खडी, कासारवाडी परिसरातील शेतकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गणेश मंदिर पासून रात्री नऊ च्या दरम्यान डंपर गाडी लावण्यासाठी क्रशर कडे जात असताना खाणीच्या रोडवरून तीन गवे चालताना डंपर चालक विकास भगत, पवन देसाई, धनाजी गायकवाड यांना दिसले त्यांनी डपर जाग्यावर थांबविला व ते गवे भोसले खडी च्या दिशेने गेले. त्या ठिकाणी उसात थांबून परत पश्चिमेकडे गवे गेल्याचे भोसले खडीच्या शेतकऱ्यानी सांगितले.
गेल्या महिनाभरापासून कासारवाडी अंबपवाडी परीसरात गव्यांच्या कळपाने ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तर भोसलेखडी परिसरात अनेक उसाची शेती बरोबर शाळू चे पीक मोठ्या प्रमाणात आहे.यांचे नुकसान होत असून याबाबत वन विभागाने हे गवे जंगलाच्या आदिवासात सोडावे अशी मागणी होत आहे.