For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुडाळ जिजामाता चौकादरम्यानच्या रस्त्याची साईडपट्टी चिखलमय

05:48 PM May 25, 2025 IST | अनुजा कुडतरकर
कुडाळ जिजामाता चौकादरम्यानच्या रस्त्याची साईडपट्टी चिखलमय
Advertisement

पादचाऱ्यांना नाहक त्रास

Advertisement

वार्ताहर/कुडाळ
कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने शहरातील कुडाळ पोलीस ठाणे ते जिजामाता चौक दरम्यानच्या मुख्य रस्त्यालगत आरसीसी नवीन गटार बांधणी व जलवाहिनीचे काम मागील काही दिवसापासून सुरु आहे. मात्र अचानक सुरु झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे या कामात अडथळा आल्यामुळे काम अर्धवटच राहिले. गटार व जलवाहिनीचे काम करीत असताना माती रस्त्यालगत टाकण्यात आली होती. त्यामुळे या रस्त्याची साईडपट्टी चिखलमय बनली आहे. पादचाऱ्यांना साईडपट्टीवरून चालताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या जास्तीत-जास्त पादचारी हे रस्त्यावरुन चालत आहेत.कुडाळ नगरपंचायतीच्यावतीने कुडाळ पोलीस ठाणे ते जिजामाता चौक मुख्य रस्त्यालगत चर खोदाई करून नव्याने जलवाहिनी टाकण्यात आली आहे. जलवाहिनी टाकून चर बुजविण्यात आला. त्यानंतर रस्त्यालगत आरसीसी गटार बांधकाम हाती घेण्यात आले होते. या कामावेळी माती मुख्य रस्त्यालगत एका बाजूला टाकण्यात आली होती. मात्र अचानक सुरु झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे हे काम अपूर्ण राहिले आहे. पावसाचा या कामात सतत व्यत्यय सुरु आहे. सध्या पोलीस ठाणे ते जिजामाता चौकपर्यंत एका बाजूने पूर्णपणे रस्त्याची साईडपट्टी चिखलमय बनली आहे. तसेच या रस्त्याच्या साईड पट्टीवर चार चाकी वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे तेथील भागात अजूनच दलदल निर्माण झाली आहे. पाऊस सुरु झाल्यापासून ही परिस्थिती जैसे थे आहे. पादचाऱ्यांना साईडपट्टीवरून चालणे त्रासदायक बनले आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त पादचारी हे रस्त्याचा वापर करून रस्त्यावरुनच चालत आहे. त्यामुळे एखाद्यावेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या नागरिक व वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.पाऊस सुरु होण्यापूर्वी या गटाराचे काम जोरात सुरु होते. मात्र अचानक सुरु झालेल्या पावसामुळे या कामात अडथळे निर्माण झाले आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालयानजीक मालवण मार्गावरील मोरीच्या तोंडावरील गटाराचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे त्याठिकाणीही पावसाचे पाणी साचले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.