कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आमटे येथील शिवपुतळा-स्मारकाचे 1-2 एप्रिल रोजी अनावरण-लोकार्पण

10:39 AM Mar 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती

Advertisement

वार्ताहर/जांबोटी 

Advertisement

आमटे ता. खानापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारूढ पुतळ्याचे लोकार्पण व अनावरण तसेच स्मारकाचे उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम दि. 1 व दि. 2 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे उपस्थित राहणार आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यापासून गावातील लोकांना प्रेरणा मिळावी व त्यांचा आदर्श आजच्या युवापिढीने जोपासावा, या उद्देशाने आमटे गावातील पंचकमिटी व शिवशक्ती युवक मंडळाच्यावतीने मागीलवर्षी गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यानुसार गावातील युवक मंडळाच्या अथक परिश्रम व दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून केवळ एक वर्षाच्या कालावधीतच हा संकल्प पूर्णत्वास नेण्यात आला आहे.

गावच्या मुख्य प्रवेशद्वारात ग्राम पंचायत कार्यालयाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या चौथऱ्याचे व शिवस्मारकाचे बांधकाम पूर्ण केले आहे. यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आसनारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. बेळगावचे सुप्रसिद्ध शिल्पकार जे. जे. पाटील यांनी सुबक शिवाजी महाराजांचा पुतळा बनविला असून, त्याचे लोकार्पण होणार असल्यामुळे आमटे गावच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार आहे. आमटे येथील शिवपुतळ्dयाचा लोकार्पण व अनावरण सोहळा दि. 1 व दि. 2 एप्रिल रोजी आयोजित केला आहे. दि. 1 एप्रिल रोजी शिवमूर्तीचा आगमन सोहळा  असून, दुपारी 12.30 वा. जांबोटी बसस्थानकापासून सवाद्य मिरवणुकीने प्रारंभ होणार आहे. दि. 2 एप्रिल रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व शिवपुतळ्याचे मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर महाप्रसाद व रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज व महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, माजी आमदार संजय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व शिवप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन पंचकमिटी, ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article