For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सदाशिवनगर स्मशानभूमीतील शेडचे काम अंतिम टप्प्यात

10:38 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
सदाशिवनगर स्मशानभूमीतील शेडचे काम अंतिम टप्प्यात
Advertisement

पत्रे बसविण्यास प्रारंभ : लवकरच होणार उपलब्ध

Advertisement

बेळगाव : सदाशिवनगर येथील स्मशानभूमीतील शेडची युद्धपातळीवर उभारणी सुरू करण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून या कामाला सुरुवात करण्यात आली असून या शेडवर लोखंडी रॉडसह पत्रे बसविण्याचे काम सुरू आहे. यामुळे काही दिवसातच ही स्मशानभूमी उपलब्ध होणार आहे.सदाशिवनगर येथील स्मशानभूमीमधील अंत्यसंस्कार होणाऱ्या शेडची अवस्था दयनीय झाली होती. त्यामुळे नव्याने त्याची उभारणी करण्याबाबत नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी जोरदार आवाज उठविला होता.

त्यानंतर तातडीने महापौरांनी या कामासाठी विशेष निधीची तरतूद केली होती. उन्हाळ्यामध्येच नव्याने त्याची उभारणी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र, काही कारणास्तव मध्यंतरी हे काम बंद होते. याबाबत जनतेतून तक्रारी वाढल्या. त्यामुळे कामाला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील एक प्रमुख स्मशानभूमी म्हणून सदाशिवनगरातील या स्मशानभूमीकडे पाहिले जाते. या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात अंत्यसंस्कार होत असतात. मात्र, शेड नसल्यामुळे समस्या निर्माण झाली होती. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे आणखीनच गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हे शेड उपलब्ध होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.