For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आकाशात बदलणार लढाऊ विमानाचा आकार

06:19 AM Dec 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
आकाशात बदलणार लढाऊ विमानाचा आकार
Advertisement

डीआरडीओकडून परीक्षण : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची मोठी झेप

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने आता मोठी कामगिरी करत निवडक देशांच्या यादीत स्थान मिळविले आहे. आता भारताची लढाऊ विमाने आकाशात उड्डाण करत असताना स्वत:चा आकार बदलू शकणार आहेत. डीआरडीओने हायटेक फायटर जेट मॉर्फिंग विंग तंत्रज्ञानाचे यशस्वी परीक्षण पेले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शत्रूला संघर्षाच्या स्थितीत चकविता येणार आहे.

Advertisement

मॉर्फिंग विंग तंत्रज्ञानात मिळालेल्या मोठ्या यशामुळे लढाऊ विमान मोहिमेदरम्यान स्वत:च्या पंखांचा आकार डायनॅमिक  स्वरुपाने बदलू शकणार आहे. ही एक अशी क्षमता आहे, ज्याला नासा, एअरबस आणि डीएआरपीए यासारख्या जागतिक कंपन्यांनी आजमाविले होते. आता भारताची स्वत:ची एअरोनॉटिक्स इकोसिस्टीम या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला फ्लाइटसाटी तयार हार्डवेअरमध्ये आजमावत आहे.

डीआरडीओकडून यशस्वी परीक्षण

डीआरडीओने सीएसआयआर-नॅशनल एअरोस्पेस लेबॉरेट्रीज (एनएएल)सोबत मिण्tन आकाशात रियल-टाइम ज्योमेट्रिक अॅडजस्टमेंटचे यशस्वी प्रदर्शन केले आहे. या प्रकल्पात सामील एक वरिष्ठ डीआरडीओ वैज्ञानिकानुसार एअरक्राफ्ट विंग नेहमीच एक तडजोड असते. मॉर्फिंग आम्हाला याला उ•ाणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांसाठी अत्यंत अधिक एअरोडायनॅमिक एफिशिएन्सीसोबत रीकॉन्फिगर करण्याची सुविधा देतो. हा विकास केवळ नव्या उत्पादनांविषयी नाही. मॉर्फिंग विंग्स भारतीय लढाऊ विमान कशाप्रकारे स्टील्थ, मॅन्यूवरेबिलिटी आणि फ्यूल एफिशियन्सी प्राप्त करू शकेल यात एक मूलभूत बदल घडवून आणत असल्याचे वैज्ञानिकाने म्हटले आहे.

कमी वेळेत बदलतो आकार

मॉर्फिंग विंग्सची खास बाब म्हणजे विमानाचे पंख आकाशात एका सेकंदांच्या 1 हजाराव्या हिस्स्यात स्वत:चा आकार बदलू शकतात. यात गरजेनुसार टेकऑफवेळी सर्वाधिक लिफ्ट, क्रूजिंगदरम्यान कमी ड्रॅग आणि कॉम्बॅट स्थितीत अधिक मॅन्युवर विंग स्वत:ला अनुरुप करून घेतात. या तंत्रज्ञानामुळे लढाऊ विमान अधिक इंचन वाचविण्यासोबत रडारपासून वाचण्यास सक्षम होतो.

मॉर्फिंग विंग्समध्ये काय-काय असते?

?आयर्न-बेस्ड शेप मेमोरी अलॉयला पंखांच्या आत बसविण्यात आले आहे.

?यात पंख दुमडण्यासाठी एसएमए गरम होत आकुंचित होतो.

?पंखाला मूळ स्थितीत पोहोचण्यासाठी ऊर्जेचा प्रवाह बंद करावा लागतो.

?रडार सिग्नेच्रा कमी करण्यासाठी पंखात कुठलीच गॅप नसते.

?लढाऊ विमानाच्या पंखांमध्ये धातूचा जोड अत्यंत कमी राहतो.

?ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी प्रत्येक हिस्स्यात केवळ गरजेनुसार ऊर्जेचा वापर.

Advertisement
Tags :

.