महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शेअर बाजारात घसरणीचे सत्र कायम!

07:00 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 109 अंकांनी प्रभावीत : धातू व बँकिंग क्षेत्रे नुकसानीत

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील गुरुवारच्या सत्रात व सलगच्या पाच सत्रांमध्ये घसरणीचा कल कायम राहिल्याचे दिसून आले. यामध्ये जागतिक पातळीवरील संकेतामधील नकारात्मक स्थितीमुळे भारतीय बाजारात पडझडीचे वातावरण राहिले. यामध्ये धातू, बँकिंग व आर्थिक क्षेत्रांमधील कंपन्यांमध्ये विक्रीचा कल राहिला होता. विदेशी फंड गुंतवणुकदारांनी गुंतवणूक काढून घेतल्यामुळे बाजारातील सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. इंट्रा-डे ट्रेडमध्ये मोठी घसरण राहिल्यानंतर बीएसई सेन्सेक्समध्ये टाटा मोर्ट्स आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांच्या समभागांनी प्राप्त केलेली तेजी गमावत घसरण नोंदवली आहे. यामध्ये दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 109.08 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 80,039.80 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 7.40 अंकांनी घसरुन निर्देशांक 24,406.10 वर बंद झाला आहे.

मुख्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील 30 समभागांमधील 17 समभाग हे प्रभावीत राहिले आहेत. तसेच अॅक्सिस बँक, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक, टायटन आणि टाटा स्टील यांचे समभाग हे घसरणीत पहिल्या पाचमध्ये राहिले आहेत. यासह इंडसइंड बँक, आयटीसी, जेएसडब्ल्यू स्टील, स्टेट बँक, भारती एअरटेल, हिंदुस्थान युनिलिव्हर,  टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, एशियन पेन्ट्स, एनटीपीसी आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग हे नुकसानीत राहिले आहेत. तसेच टाटा मोर्ट्स, लार्सन अॅण्ड टुब्रो, सनफार्मा, कोटक बँक आणि एचडीएफसी बँक या पाच कंपन्यांचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले आहेत. तसेच पॉवरग्रिड कॉर्प, बजाज फायनान्स, टीसीएस, एचसीएल टेक, अदानी पोर्ट्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, मारुती सुझुकी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत. जागतिक बाजारात आशियातील बाजारांमधील सियोल, टोकीओ, शांघाय आणि हाँगकाँग यांचे निर्देशांक घसरणीत राहिले.

समभाग वधारलेल्या कंपन्या

 समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article