महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चाकरमान्यांना चिंता आता परतीच्या प्रवासाची!

06:38 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोकण रेल्वेतील चेंगराचेंगरी, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडी, सीएनजीसाठी रांगा अशी एकापेक्षा एक दिव्य संकटे पार करत चाकरमानी 17-18 तासांच्या रखडपट्टीनंतर का होईना लाडक्या बाप्पासाठी कोकणातील गावात दाखल झाला. गावच्या गणेशोत्सवात तो रंगूनही गेला. मात्र आता त्याला पुन्हा चिंता सतावतेय ती आपल्या परतीच्या प्रवासाची. गेली अनेक वर्षे गणेशोत्सवात सुरू असलेला वेदनांचा प्रवास नेमका थांबणार तरी कधी, असा प्रश्न आता चाकरमान्यांकडून विचारला जात आहे.

Advertisement

गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आणि विशेषत: कोकणवासियांच्या अस्मितेचा, श्रध्देचा, जिव्हाळ्dयाचा आणि संस्कृतीचा विषय आहे. गणेशोत्सवाची वाट प्रत्येक मराठी माणूस व विशेषत: कोकणवासीय वर्षभर बघत असतो. कामानिमित्त जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असला, कितीही अडचणी असल्या तरी कोकणवासीय चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जातोच. त्याची तयारी व नियोजन प्रत्येक कोकणवासीय चाकरमानी अगदी वर्षभरापासून करत असतो. गणेशोत्सव हा कोकणाचा मोलाचा ठेवा व सांस्कृतिक संचित असले तरी त्यासाठी प्रवास हा कायम हाल-अपेष्टांचा राहिलेला आहे. कोकणातून जाणारा आणि गेल्या 13 वर्षापासून रखडलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होत नाही आणि कोकण रेल्वेच्या सिंगल ट्रॅकचा डबल टॅक जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत  चाकरमान्यांचा उत्सव काळात कोकणातील वेदनांचा प्रवास सध्या तरी थांबणारा दिसत नाही.

Advertisement

कोकणात लाखो चाकरमानी दाखल

यावर्षी 7 सप्टेंबरला गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. यावर्षी कोकणातील गणेशोत्सवाला मुंबई, ठाणे, पुणेकर लाखो चाकरमान्यांनी रत्ना†गरी, रायगड आा†ण सिंधुदुर्ग ा†जह्यात हजेरी लावली. कधी नव्हे तो यावर्षी चाकरमान्यांच्या गर्दीचा उच्चांक गाठला गेला. परिणामी कोकणात एरव्ही शांत असलेली गावे व कुलूपबंद असलेली घरे या उत्सवाच्या निमित्ताने गेली आठवडाभर गजबजून गेली आहेत. कोकणात सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा घरगुती गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असल्याने शहरांपेक्षा गावोगावच्या उत्सवात एक वेगळाच उत्साह पहायला मिळतो. कामानिमित्त मुंबईसह इतर शहरात असणारे चाकरमानीच नव्हे तर देश-विदेशातूनही अनेकजण आपल्या गावी आल्याने या उत्सवाला इतर सणापेक्षा एक वेगळाच रंग यावर्षी चढलेला दिसला.

कोकण रेल्वेमुळे महामार्गावरील ताण कमी 

कोकण रेल्वे ही कोकणवासियांची जीवनवाहिनी आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवालाही कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी तब्बल 310 हून अधिक जादा गाड्या सोडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचा ताण काहीसा कमी झाला. तसे पाहिले तर रायगडनंतर रेल्वेचा पुढील सिंधुदुर्गपर्यंतचा प्रवास हा सिंगल ट्रॅकचा आहे. तरीही कोकण रेल्वे दरवर्षी क्षमतेपेक्षाही अधिक गाड्या सोडत आहे. प्रसंगी सुटणाऱ्या गाड्यांना डबेही वाढवत आहे. मात्र चाकरमान्यांची संख्याच दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नियमितच्या रेल्वेगाड्यांबरोबर जादा गाड्यांचा उत्सव काळात या सिंगल ट्रॅकवर मोठा ताण पडतो. परिणामी वाहतूक कोलमडून जाते. यावर्षीही तेच घडलं. आता आलेल्या चाकरमान्यांना पुन्हा त्यांच्या परतीच्या मार्गात महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. विशेष म्हणजे सिंगल ट्रॅक असतानाही तारेवरची कसरत करत रखडपट्टीमुळे वैतागलेल्या प्रवाशांकडून दुषणे झेलूनही जादा गाड्या सोडत असल्याबद्दल कोकण रेल्वे प्रशासन अभिनंदनास पात्र ठरत आहे.

 परतीच्या प्रवासापूर्वी तरी त्या चुका सुधाराव्यात

कोकणात कोकण रेल्वेनंतर एकमेव सुरक्षित प्रवास म्हणजे मुंबई-गोवा महामार्गाचा आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. दरवर्षी गणेशोत्सवा†ना†मत्ताने मोठ्या संख्येने चाकरमानी रस्तामार्गे कोकणात येतात. त्यामुळे महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होते. रायगड जिल्ह्यात कासू ते नागोठणे, वाकण ते कोलाड, इंदापूर, माणगाव आणि लोणेरे येथे महामार्गाची कामे अपूर्ण असल्याने या पट्ट्यात सातत्याने वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. इंदापूर, माणगाव येथील कंत्राटदार काम सोडून निघून गेल्याने बाह्यवळण रस्त्याची कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. कोलाड, नागोठणे, लोणेरे येथे उ•ाणपुलांची कामे अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे कोंडी टाळायची असेल तर आधी माणगाव व इंदापूर येथील बाह्यवळण रस्त्यांची कामे मार्गी लावायला हवीत. त्यानंतर कोलाड आणि लोणेरे येथील उ•ाणपुलांचे काम तातडीने पूर्ण व्हायला हवे. अवजड वाहतूक बंदीचे तंतोतंत पालन व्हायला हवे. लेनची शिस्त न पाळणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई व्हायला हवी. तरच वाहतूककोंडी टळणार आहे. येताना ज्या चुका झाल्या, त्या परतीच्या प्रवासात थोड्याफार टाळण्याचा प्रयत्न झाला तर दिलासा तरी मिळेल.

मोफत एसटी, टोलमाफीची फुंकर

रखडलेल्या महामार्गाबाबत कोकणी जनतेत संताप असतानाच त्यावर फुंकर घालण्याचा प्रयत्न विविध राजकीय पक्ष, नेते यांच्याकडून केला गेला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विविध राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेतेमंडळांनी आपले मोठमोठे बॅनर लावून मोफत एसटी बसेस सोडल्या. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठे

ऊन नेतेमंडळीनी बसेस बूक केल्याने कधी नव्हे त्या यावेळी कोकणात तब्बल 5 हजाराहून अधिक केवळ एसटी बसेस आल्या. यानिमित्ताने आतापर्यंतचे एसटीचे सारे विक्रम मोडीत निघाले आहेत. सोडलेल्या बसेस गळक्या होत्या. त्याचा त्रास चाकरमान्यांना झाला. त्यातच सीएनजी भरण्यासाठीही बराच वेळ रांगेत घालवावा लागल्याने आणि त्यातच महामार्गावरची वाहतूककोंडी यामुळे वैतागलेला चाकरमानी बस सुटल्यानंतर तब्बल 17-18 तासांनी घरी पोहचला. सरकारने टोलमाफीही जाहीर केली होती. मात्र प्रवासात हाल झाल्याने मोफत बससेवेचे, टोलमाफीचे स्वागत करण्याऐवजी मोफत प्रवास नको, त्याऐवजी रस्ते व्यवस्थित सुधारा, प्रवासासाठी दर्जेदार सोयी-सुविधा पुरवा, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. किमान परतीच्या प्रवासात तरी सुधारणा व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करणे स्वाभाविक आहे.

मोफत प्रवास, टोलमाफी नको, रस्ता सुधारा

घरगुती गणपतीचे गुरूवारी दुपारनंतर विसर्जन झाल्यानंतर गावाला आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. यामुळे पुढील 4-5 दिवस एसटी बसेस, खासगी वाहनांनी महामार्ग गजबजून जाणार आहे. मात्र येताना वाहतूककोंडी, सीएजनीसाठीच्या रांगा, ख•sमय रस्ता असे जे काही वाट्याला आले ते पुन्हा परतीच्या प्रवासात वाटेला येऊदे नको, अशी प्रार्थना प्रत्येक चाकरमानी आपल्या बाप्पासमोर करीत असला तरी तरी सध्याच्या परिस्थितीचा विचार करता यामध्ये फारसा फरक पडेल, अशी चिन्हे दिसत नाहीत.

मुख्यमंत्री, बांधकाम मंत्र्यांचे दौरे फेल

गतवर्षी गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील प्रवास सुखकर व्हावा म्हणून तब्बल 9 दौरे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. त्यानंतर वर्षभरात पुन्हा दौरे केले. मात्र या दौऱ्याचा महामार्गच्या कामावर यत्किंचितही फरक पडलेला नाही. गणेशोत्सवापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दौरा केला, मात्र तरीही परिस्थिती जैसे थे राहिली. निष्पन्न काहीच होत नसेल तर मग दौऱ्याचा दिखावूपणा कशासाठी? यावर्षीच्या प्रवासातील यातायात लक्षात घेऊन पुढील वर्षभरात अधिक लक्ष दिले तर पुढील गणेशोत्सवाचा प्रवास तरी सुखकर होईल.

राजेंद्र शिंदे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article