‘बे दुणे तीन’ सीरिज येतेय
अभय-नेहाच्या आयुष्याचा गोड-तिखट प्रवास
झी5 या अॅपवर 5 डिसेंबर रोजी मराठी वेबसीरिज प्रदर्शित होणार असून याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘बे दुणे तीन’ ही सीरिज आधुनिक नातेसंबंधातील आनंद, गोंधळ आणि जीवनातील छोटे छोटे अनुभव दाखविणारी आहे. यात दीक्षा केतकर, विराजस कुलकर्णी, शुभांकर एकबोट, क्षितिश दाते, पुष्करराज चिरपुटकर आणि शिवानी रांगोळे हे प्रमुख भूमिका साकारत आहेत. ही कथा अभय आणि नेहा या युवा जोडप्याभवती फिरते, ज्यांना अचानक बाळ होणार असल्याचे समजल्यावर त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलते.
या सीरिजचे दिग्दर्शन अथर्व सौंदणकर आणि हिमांशू पिले यांनी केले आहे. तर वृषांक प्रॉडक्शन्सने याची निर्मिती केली आहे. जिव्हाळा, विनोद आणि वास्तववाद एकत्र करणारी एक नवी कथा यात दिसून येणार आहे. यात प्रभावशाली अभिनय आणि मनाला भिडणारी कथा आहे.
या सीरिजमध्ये अभय ही भूमिका क्षितीश साकारत आहे. बे दुणे तीन ही खरोखरच वास्तवाच्या खूप जवळ वाटणाऱ्या कथांपैकी एक आहे. एकक्ष क्षणातच एक नव्हे तर तीन बाळांचा पिता होण्याची कल्पना नैसर्गिक अनागोंदी माजवते आणि त्याचवेळी त्यामध्ये एक सुंदर हळवेपणा सुद्धा उघड करते. या सीरिजमध्ये काम करणे मनाला भिडणारी अनुभूती राहिली असल्याचे क्षितीशने म्हटले आहे.