अंतिम सत्रात सेन्सेक्स 886 अंकांनी कोसळला
बाजारात चौफेर विक्रीचा फटका : सलगच्या पाच दिवसांच्या तेजीला विराम
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजार चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी मोठ्या घसरणीसह बंद झाल्याचे दिसून आले. यामध्ये मागील पाच सत्रांमधील तेजीला शुक्रवारच्या अंतिम सत्रात सेन्सेक्सला ब्रेक लागला व तब्बल 886 अंकांनी निर्देशांक कोसळला आहे. अमेरिकेतील जॉब डेटा समोर आल्यानंतर विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी जबरदस्त विक्री केली आणि त्याचा परिणाम धातू, वाहन आणि आयटी क्षेत्रातील समभागांमध्ये झाल्याचे दिसून आले.
विदेशी गुंतवणूकरांकडून मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आल्यानंतर अंतिम क्षणी बीएसई सेन्सेक्स 885.60 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 1.08 टक्क्यांच्या घसरणीसोबत 80,981.95 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारात 50 समभागांमधील नकारात्मक स्थितीमुळे दिवसअखेर 293.20 अंकांनी घसरुन निर्देशांक 24,717.70 वर बंद झाला आहे.
बाजारातील अभ्यासकांच्या माहितीनुसार देशातील बाजारांमध्ये विक्रीचा मारा मोठा राहिला होता. दिग्गज कंपन्यांमध्ये शुक्रवारी निफ्टी फार्मा या क्षेत्रातील समभाग 0.52 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत. एकूण निफ्टीतील 8 समभाग वधारले असून अन्य समभाग हे प्रभावीत राहिल्याचे दिसून आले. वधारलेल्या कंपन्यांमध्ये डिव्हीस लॅब, एचडीएफसी बँक, डॉ. रे•ाrज लॅब, सनफार्मा, ब्रिटानिया, नेस्ले इंडिया, कोटक बँक आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग वधारले आहेत.
अन्य कंपन्यांमध्ये आयशर मोटर्सचे समभाग 5.5 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. यासह टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, जेएसडब्ल्यू स्टील आणि हिंडाल्को यांचे समभाग घसरणीत राहिले.
या क्षेत्रांमध्ये घसरण
क्षेत्रांनुसार स्थिती पाहिल्यास यामध्ये निफ्टीमधील वाहन, आयटी आणि धातू यांचे क्षेत्र हे 2 टक्क्यांनी प्रभावीत राहिले.
जागतिक बाजार
भारतीय बाजारासह आशियातील बाजारांमध्ये चीनचा शांघाय कम्पोझिट, हाँगकाँगचा हँगसेंग, जपानचा निक्की आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी हे घसरणीत राहिले. तर युरोपीय बाजार हे नुकसानीत राहिले आहेत.
शेअर बाजारामधील आकडेवारीनुसार गुरुवारी विदेशी संस्थांत्मक गुंतवणूकदारांनी बाजारात जोरदार विक्री केली आहे. यामध्ये 2,089.28 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी करण्यात आली आहे.