अंतिम सत्रात सेन्सेक्स १२५ अंकांनी घसरला
स्मॉल कॅप आणि मिडकॅप निर्देशांक नुकसानीत : निफ्टीही 88.65 वर प्रभावीत होत बंद
वृत्तसंस्था, मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनइसई निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले आहेत. दरम्यान यामध्ये सलग दोन आठवड्यांपासून साप्ताहिक वाढीमध्ये खंड पडला आहे. प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 125.56 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 73,123.83 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दिवसअखेर 87.65 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 22,600.00 वर बंद झाला आहे. सलग दोन आठवड्यांपासून साप्ताहिक वाढीत खंड पडला. बाजारात मेटल, रिअल्टी, कंझ्युमर ड्युरेबल्ससह वित्तीय क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली. व्यापक बाजारातही जोरदार विक्री झाली. मिडकॅप निर्देशांक 2.2 टक्क्यांनी घसरून बंद झाला. स्मॉलकॅप शेअर्स अधिक कमजोर होते. निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक सुमारे 3 टक्क्यांनी घसरला. व्होलॅटिलिटी इंडेक्स इंडिया 6.3 टक्क्यांनी वाढून 16.76 वर बंद झाला.
शुक्रवारी शेअर बाजारात मोठी हालचाल दिसून आली. सकाळी जोरदार सुरुवातीनंतर, दुपारी जोरदार विक्री झाली, ज्यामुळे बाजार जवळपास घसरणीत बंद झाला. आयटी शेअर्स आणि आरआयएलमधील वाढीमुळे मुख्य निर्देशांकाला आधार मिळाला. तथापि, निर्देशांक सलग चौथ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. पण सेन्सेक्स आणि निफ्टीने सलग चार सत्रांमध्ये प्रत्येकी 3 टक्के पेक्षा जास्त घसरण नोंदवली आहे. व्हेंचुराचे संशोधन प्रमुख विनीत बोलिंगकर म्हणाले की, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती भारतीय शेअर बाजारासाठी सर्वात मोठी चिंता आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्रेंट क्रूडने मे महिन्याच्या सुरुवातीपासूनची सर्वोच्च पातळी गाठली आहे. रुपयाने अलीकडील नीचांकी पातळीवरून निश्चितच सावरले असले तरी, तो अजूनही कमकुवत आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून होणारी सततची विक्री आणि रुपया नियंत्रित ठेवण्यासाठी आरबीआयचे प्रयत्नही बाजाराच्या भावनांवर दबाव आणत आहेत.
बाजाराची पुढील वाटचाल काय असेल?
पीएल कॅपिटलचे मुख्य व्यवसाय अधिकारी (सल्ला आणि व्यवहार) विक्रम कसात म्हणाले की, बाजारातील गुंतवणूकदार जोखीम घेणे टाळत आहेत. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 114 डॉलरच्या जवळ पोहोचल्याने महागाईचा धोका वाढला आहे. रुपया प्रति डॉलर सुमारे 95.15 पर्यंत कमजोर झाला. वाढत्या यूएस बाँड यील्डच्या दबावामुळे सोन्याच्या किमतीही 1,900 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1.42 लाख रुपयांवर आल्या.
