जागतिक संकेतामुळे सेन्सेक्स 1158 अंकांनी कोसळला
सलग पाचवे सत्र नुकसानीत : निफ्टीही घसरणीसह बंद
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारात सलग पाचव्या सत्रात गुरुवारी घसरणीचा कल राहिला होता. जागतिक पातळीवरील नकारात्मक वातावरणामुळे सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक दोन टक्क्यांनी प्रभावीत होत बंद झाले आहेत.
विदेशी संस्थांकडून गुंतवणूकदारांनी विक्री केल्याने भारतीय बाजारात नकारात्मक स्थित राहिली होती. कारण यामध्ये एप्रिलमधील चलनवाढ व मार्च महिन्यातील औद्योगिक उत्पादनांचे आकडे सादर करण्यात येण्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूक सावध भूमिका घेत असल्याने सेन्सेक्स तब्बल 1,158 अंकांनी कोसळला असल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 1,158.08 अंकांनी घसरुन निर्देशांक 52,930.31 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 359.10 अंकांनी घसरुन निर्देशांक 15,808.00 वर बंद झाला आहे.
जागतिक बाजारांमध्ये प्रामुख्याने जागतिक अर्थव्यस्थांमध्ये चलनवाढ होत असल्याने जगातील शेअर बाजारांची नजर ही अमेरिकन केंद्रीय बँक व्याजदरांसह अन्य पावले उचलली जात असल्यामुळे त्याचे पडसाद विविध देशातील आर्थिक उलाढालीवर होत असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.
सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँक, टाटा स्टील, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, ऍक्सिस बँक, एचडीएफसी, टायटन आणि भारतीय स्टेट बँक यांचे समभाग नुकसानीत राहिले आहे. दुसऱया बाजूला फक्त विप्रो व एचसीएल टेक यांचे समभाग लाभात राहिले आहेत.
जागतिक बाजारात जपानचा निक्की, हाँगकाँगचा हँगसेंग, चीनचा शांघाय कम्पोजिट आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी हे घसरणीत राहिले आहेत. युरोपीयन बाजाराचे सत्र दुपारपर्यंत नुकसानीत राहिले होते. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड 2.02 टक्क्यांनी घसरुन 105.7 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.
गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा
जागतिक गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवली बाजारातून समभाग विक्री करण्याचा सिलसिला कायम ठेवला आहे. यामध्ये शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी बुधवारी जवळपास 3,609.35 कोटी रुपये मूल्याचे समभाग विक्री केली आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- विप्रो................. 475
- अंबुजा सिमेंट...... 372
- आयओसी........... 121
- अशोक लेलँड....... 117
- एसीसी............ 2177
- ज्युबिलंट फूड...... 469
समभाग घसरलेल्या कंपन्या
- इंडसइंड बँक....... 869
- टाटा स्टील....... 1118
- बजाज फायनान्स 5588
- बजाज फिनसर्व्ह 12848
- ऍक्सिस बँक........ 649
- एचडीएफसी बँक 1303
- एचडीएफसी..... 2150
- टायटन............ 2048
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1524
- स्टेट बँक............. 462
- कोटक महिंद्रा.... 1761
- एनटीपीसी......... 148
- आयसीआयसीआय 695
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 864
- भारती एअरटेल... 705
- अल्ट्राटेक सिमेंट. 6200
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2400
- नेस्ले.............. 16234
- मारुती सुझुकी... 7269
- पॉवरग्रिड कॉर्प.... 235
- इन्फोसिस........ 1509
- आयटीसी........... 252
- हिंदुस्थान युनि.. 2141
- टेक महिंद्रा....... 1215
- सन फार्मा.......... 850
- एशियन पेन्ट्स.. 3040
- एचसीएल टेक... 1058
- टीसीएस.......... 3411
- डॉ.रेड्डीज लॅब... 3884
- बजाज होल्डींग्स 4830
- वेदान्ता.............. 312
- सीजी कझ्युमर..... 348
- जेएसडब्लू स्टील.. 624
- अपोलो हॉस्पिटल 3580
- हॅवेल्स इंडिया... 1199
- अरोबिंदो फार्मा... 570