For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साळावली धरणात दोन महिने पुरेल एवढा पाणीसाठा

06:33 AM Apr 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
साळावली धरणात दोन महिने पुरेल एवढा पाणीसाठा
Advertisement

पाऊस पडल्यास पाण्याची पातळी वाढणार

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

मडगाव : दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या साळावली धरणात सध्या एप्रिल अखेरीस असलेला पाण्याचा साठा पुढील दोन महिने शेती, पिण्यासाठी व वापरण्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे सध्या तरी पाण्यासाठी चिंता करण्याचे कारण नाही.

Advertisement

अवेळी पाऊस पडला तर पाण्याची पातळी आणखी वाढणार असल्याचे जलस्रोत खात्याचे सहाय्यक अभियंता रेगन डिसोझा यांनी सांगितले. सध्याची पाण्याची पातळी 33.68 मीटर, कमाल पाणी पातळी 41.15 मीटर, सध्याचा साठा 102 मिलीयन क्मयूबिक मीटर तर एकूण क्षमता 23436 हेक्टर मीटर अशी आहे. धरण सध्या साधारण 43.5 टक्के भरलेले आहे.

गेल्या वषी या तारखेला धरण 47.25 टक्के भरलेले होते. गेल्यावर्षी अवेळी पाऊस पडल्याने धरणात पाणी साचले होते. मात्र, यंदा अवेळी पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पाण्याची पातळी घटली आहे. गेल्या वर्षापेक्षा यावषी कमी साठा असल्याने वेळेवर पाऊस पडला नाही तर पाण्याची टंचाई होऊ शकते. पण सध्या तरी पाणी पाहिल्यास चिंता करण्याचे कारण नसल्याचे डिसोझा यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.