For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सलग दुसरे सत्रही घसरणीसह बंद

06:37 AM Jan 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
सलग दुसरे सत्रही घसरणीसह बंद
Advertisement

आयटी समभागात विक्री : सेन्सेक्स 536 अंकांनी प्रभावीत

Advertisement

मुंबई :

जागतिक बाजारात घसरणीचा कल राहिल्याचा परिणाम हा चालू आठवड्यातील बुधवारच्या सत्रात दिसून आला आहे. यामध्ये सलग दुसऱ्या सत्रात घसरणीची नोंद केली आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स तब्बल 535 अंकांनी नुकसानीत राहिला आहे.

Advertisement

प्रमुख क्षेत्रांची स्थिती पाहिल्यास यामध्ये बुधवारी आयटी क्षेत्रासोबत आर्थिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये झालेली विक्री यामुळे निर्देशांकांत मोठी हिस्सेदारी प्राप्त करणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले आहेत. यावेळी आयटीचा निर्देशांक 2.52 टक्क्यांनी घसरणीत राहिल्याची नेंद केली आहे. 21 जुलै 2023 नंतर ही सर्वात मोठी दिवसभरातील घसरण झाल्याची माहिती आहे.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बुधवारी दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 535.88 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 71,356.60 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 148.45 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 21,517.35 वर बंद झाला आहे.

मुख्य कंपन्यांच्या कामगिरीमध्ये दिवसभरात सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेचे समभाग हे सर्वाधिक 1.63 अंकांनी तेजीत राहिले आहेत. यासोबतच आयटीसी, भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँकेसह अन्य 10 कंपन्यांचे समभाग वधारुन बंद झाले आहेत.

अन्य कंपन्यांमध्ये जेएसडब्ल्यू स्टीलचे समभाग हे सर्वाधिक 3.76 टक्क्यांनी प्रभावीत झाले. यासह टाटा स्टील, इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा, टीसीएस, नेस्ले इंडिया, एचसीएल टेक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँकेसह अन्य 20 कंपन्यांचे समभाग घसरणीत राहिले आहेत. जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम  आयटी, धातू यांच्या निर्देशांकावर दिसला.

जागतिक बाजाराची स्थिती

बुधवारच्या सत्रात आशियातील अन्य बाजारांमध्ये सियोल आणि हाँगकाँग यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. तर चीनचा शेअर बाजार प्रभावीत झाला आहे. यासह युरोपीयन बाजारात घसरण राहिली होती.

Advertisement
Tags :

.