For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्क्विड गेमचा दुसरा सीझन येणार

06:01 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्क्विड गेमचा दुसरा सीझन येणार
Advertisement

तिसऱ्या सीझनची देखील घोषणा

Advertisement

नेटफ्लिक्सची प्रसिद्ध कोरियन सीरिज स्क्विड गेमचा पहिला सीजन 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सीरिजने जगभरात खळबळ उडवून दिली होती. पहिल्या सीझनध्ये 9 एपिसोड्सत होते आणि या सीरिजला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. यामुळे दुसऱ्या सीझनची आतुरतेने प्रतीक्षा केली जात आहे.

निर्मात्यांनी चालू वर्षातील फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या सीझनची घोषणा करत ली जुंग-जे याचा एक लुक शेअर केला होता. आता 6 महिन्यांनी याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. नेटफ्लिक्स डिसेंबरमध्ये स्क्विड गेमचा दुसरा सीझन प्रेक्षकांसाठी उपलब्ध करणार आहे. टीझरसोबत याची घोषणा करण्यात आली आहे.

Advertisement

टीजर व्हिडिओत स्पर्धकांच्या एका समुहाला गेममध्ये भाग घेताना पाहिले जाऊ शकते. लाल आणि काळे कपडे परिधान केलेले सैनिक बाजूला उभे राहून ट्रॅकवर धावताना पडल्यावर त्यांचा मृत्यू होताना पाहत असल्याचे दिसून येते. खरा खेळ सुरू होतोय, स्क्विड गेम सीजन 2 हा 26 डिसेंबर रोजी येतोय, अंतिम सीझन पुढील वर्षी येणार’ असे या व्हिडिओच्या कॅप्शनदाखल नमूद करण्यात आले आहे.

शोच्या निर्मात्यांनी सीझन 2 च्या प्रदर्शनानंतर सीझन 3 ची देखील घोषणा केली आहे. सीझन 3 पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे आणि त्याचबरोबर स्क्विड गेमचा प्रवास संपुष्टात येणार आहे.

स्क्विड गेम हा एक थ्रिलर शो असून याच्या केंद्रस्थानी मृत्यूचा खेळ आहे. शोत मुख्य भूमिका ली जुंग जे याने साकारली असून त्याला एमी पुरस्कार मिळाला होता. नेटफ्लिक्सने काही दिवसांपूर्वी दुसऱ्या सीझनमधील अन्य काही व्यक्तिरेखांची झलक छायाचित्रांद्वारे दाखविली होती.

Advertisement
Tags :

.