For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ग्राम चिकित्सालय’चा दुसरा सीझन येतोय

06:52 AM Jun 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘ग्राम चिकित्सालय’चा दुसरा सीझन येतोय
Advertisement

लोकप्रिय वेबसीरिज ‘ग्राम चिकित्सालय’चा दुसरा सीझन लवकरच येणार आहे. निर्मात्यांनी याचे नवे पोस्टर शेअर करत याच्या प्रदर्शनाची तारीखही उघड केली आहे. पहिल्या सीझनच्या यशानंतर ग्राम चिकित्सालय 2 देखील प्रेक्षकांना ग्रामीण जीवन आणि तेथील सरकारी रुग्णालयाची कहाणी दाखविणार आहे. ग्राम चिकित्सालय 2 सीरिज 23 जूनपासून प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे. ‘भातकांडी’ गावातील डॉक्टर प्रभात (अमोल पाराशर)च्या आसपास याची कहाणी घुटमळणारी आहे. डॉक्टर प्रभात गावातील रुग्णालयाला सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी त्याच्यासमोर पूर्वीपेक्षा अधिक समस्या आणि नवी आव्हाने उभी ठाकणार आहेत. या दुसऱ्या सीझनमध्ये अमोल पाराशर, विनय पाठक, आकांक्षा रंजन कपूर, आकाश मखीजा, आनंदेश्वर द्विवेदी, गरिमा विक्रांत सिंह आणि दिनेश लाल यादव हे कलाकार दिसून येणार आहेत. याचे दिग्दर्शन ललितम तिवारी यांनी केले आहे. या सीरिजची कहाणी वैभव सुमन आणि श्रेया श्रीवास्तव यांनी लिहिली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.