महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रुग्णांच्या आयुष्यातील दुसरा देव ‘डॉक्टर’!

11:49 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अविनाश पोतदार; संजीवीनी फौंडेशनवतीने डॉक्टर्स दिनी मानसोपचारतज्ञांचा सन्मान

Advertisement

बेळगाव : डॉक्टर देवासमान मानले जातात. अनेक जण वेगवेगळ्या कारणांमुळे मानसिक तणावाखाली वावरताना दिसत आहेत. अशा वेळी मानसोपचार तज्ञांसमोर मोठी जबाबदारी असते, असे मत रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार यांनी व्यक्त केले. संजीवीनी फौंडेशनच्यावतीने ‘डॉक्टर्स डे’निमित्त आयोजित मानसोपचार तज्ञांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे सीईओ मदन बामणे, बांधकाम व्यावसायिक आर. एम. चौगुले होते. मदन बामणे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.एस. एस. चाटे, डॉ. अँटोनियो कार्व्हालो आणि डॉ. विजयालक्ष्मी पुरद या मानसोपचार तज्ञांचा सन्मान शाल, स्मृतिचिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. सत्कारमूर्तींचा परिचय डॉ. सुरेखा पोटे यांनी केला. डॉ. अनिल पोटे, डॉ. सुरेखा पोटे, डॉ. अनिल सावळगी यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या. सरिता संस्थेच्या संस्थापिका डॉ. सविता देगिनाळ यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article