For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Eknath Shinde | जागावाटपाचा तिढा सुटेना अन् एकनाथ शिंदेंचा पारा चढला; 'त्या' बैठकीत नेमकं काय घडलं?

05:03 PM May 26, 2026 IST | NEETA POTDAR
eknath shinde   जागावाटपाचा तिढा सुटेना अन् एकनाथ शिंदेंचा पारा चढला   त्या  बैठकीत नेमकं काय घडलं
Advertisement

                             विधान परिषदवरून महायुतीत धुसफूस?

Advertisement

मुंबई : सध्या महायुतीमध्ये तेढ निर्माण झाल्याचे चित्र पााहायला मिळत आहे... विधान परिषदेच्या जागावाटपासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( eknath shine ) यांच्यात बैठक पार पडली. पण विधान परिषदेच्या बैठकीबाबत प्रश्न केल्याने उपमुख्यमंत्री शिंदे  पत्रकारांवर प्रचंड संतापले. त्यामुळं या बैठकीत नेमकं काय घडलं, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गेले बरेच दिवसापासुन महायुतीत विधान परिषदेच्या जागांसाठी धुसपुस चालु असल्याच्या बातम्या समोर येत आहेत... शिंदेंची शिवसेना विधान परिषदेच्या पाच ते सहा जागांसाठी आग्रही आहेत ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रायगड, हिंगोली परभणी जागांसाठी शिवसेना प्रयत्न करत आहे... तर राष्ट्रवादी काँग्रेस रायगडच्या जागेसाठी आग्रही आहे. त्यामुळे अनेकदा बैठका होऊनही महायुतीच्या जागांचा तिढा संपताना दिसत नाही.

Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांशी अनेकदा चर्चा होऊनही, एकनाथ शिंदे यांनी दिल्ली वारी करूनही विधान परिषदेच्या निवडणुकीवर तोडगा निघत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळेच की काय एकनाथ शिंदे हे पत्रकारांच्या प्रश्नावर भडकल्याचं दिसून आलं. विधान परिषदेच्या जागांवर पत्रकारांनी प्रश्न विचारताच, एकनाथ शिंदे चांगलेच संतापले. कुठलं बोलणार... काय आहे? असं म्हणत ते संतापल्याचं दिसून आलं. त्याच्या या प्रतिक्रेयेनंतर भाजपकडून शिवसेनेची कोंडी होत आहे का ? अशी चर्चांना उधान आले आहे...

Advertisement
Tags :

.