For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Konkan Mango Season | कोकणमध्ये मोहर गळला; गुढीपाडव्याला आंब्याची टंचाई

02:31 PM Feb 26, 2026 IST | NEETA POTDAR
konkan mango season   कोकणमध्ये मोहर गळला  गुढीपाडव्याला आंब्याची टंचाई
Advertisement

                            कर्नाटकातील आंब्याची आवक सुरू

Advertisement

कोल्हापूर -कोकण भागात यावर्षी आंब्याच्या बागांवर चांगला मोहर बहरला होता. मात्र थंडीमुळे गेल्या आठवड्यात मोहर गळून पडला आहे. यामुळे यंदा गुढीपाडव्याला आंब्याची टंचाई भासणार आहे. गुढी पाडवाडी यावेळी दोन आठवडा आधीच आहे. त्यातच मोहरसुध्दा गळून पडला आहे. यामुळे यावेळी गुढी पाडव्याला आंब्याची गोडी कमी असणार आहे. दरवर्षी गुढीपाडव्याला आंब्याची चव चाखली जाते. तेंव्हापासून आंबा खाण्यास प्रारंभ केला जातो. यावर्षी मात्र कोकणातील आंब्याची टंचाई भासणार असल्याचा अंदाज व्यापार्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. बाजारात लवकर आवक होण्याची शक्यता कमी असल्याने गुढीपाडव्याच्या सणाला आंब्याची टंचाई जाणवण्याची चिन्हे आहेत.

यंदा गुढीपाडवा लवकर येत असल्यामुळे नववर्षाच्या स्वागतावेळी आंब्याची चव चाखण्याची परंपरा अनेकांना पाळता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंदू संस्कृतीनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबासोबत आंब्याची चव घेण्याची प्रथा आहे. मात्र यंदा मोहर पडूनही फळ तयार होण्यासाठी अजून वेळ लागणार असल्याने बाजारात पुरेशी उपलब्धता नसेल.

Advertisement

उत्पादनाच्या दृष्टीने परिस्थिती समाधानकारक असली तरी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतरच आंब्याची मोठ्या प्रमाणावर आवक अपेक्षित आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दर्जेदार आंब्याचा आस्वाद उशिरा घ्यावा लागणार आहे. कर्नाटकातील आंब्याची आवक नेहमीप्रमाणे सुरू राहणार असली तरी स्थानिक आंब्याला असलेली पसंती लक्षात घेता बाजारभाव सुरुवातीला जास्त राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोकणातील बागायतदारांना यावर्षी उत्पादनाबाबत सकारात्मक चित्र दिसत आहे. या आंब्याची चव चाखायला मिळणार असली तरी त्याची एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्याची वाट बघावी लागणार आहे.

कोकणातील आंब्याला चांगला मोहर आला होता. मात्र गेल्या आठवड्यात प्रचंड थंडी होती. यामुळे मोहर गळून पडला आहे. साहजिकच आंबा या फळावरही परिणाम होणार आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी उशीरा आंब्याची चव चाखायला मिळणार आहे. सर्वसामान्यांनाही एप्रिलच्या दरम्यान पाहीजे तसा आंबा खायला मिळणार आहे. कर्नाटकातील आंबा नेहमीप्रमाणे येईल त्याची चव मात्र उशीरा सर्वसामान्यांना मिळणार आहे. सुरुवातील आंब्याची टंचाई भासणार आहे. - प्रसाद वळंजू, आंब्याचे व्यापारी, कोल्हापूर

Advertisement
Tags :

.