समुद्राने 70 वर्षांपर्यंत लपवून ठेवला किरणोत्सर्गी कचरा
अटलांटिक महासागराच्या सुमारे 4700 मीटर खोलवर पडलेला किरणोत्सर्गी कचरा आता वैज्ञानिकांच्या तपासणीचा हिस्सा आहे . 2026 मध्ये फ्रान्सच्या सीएनआरएसच्या टीमने नॉडस्सम रिसर्चच्या अंतर्गत खोल समुद्रात जात या जुन्या बॅरलची तपासणी केली. टीमला अनेक बॅरल अत्यंत वाईट अवस्थेत गंजलेले आढळून आले. काही ठिकाणी यातून निघालेली सामग्री समुद्राच्या तळाला फैलावलेली आढळून आली.
हे बॅरल्स अनेक दशकांपूर्वी युरोपीय देशांनी समुद्रात सोडले होते. नॉडस्सम प्रोजेक्टनुसार 1950 ते 1990 दरम्यान उत्तरपूर्व अटलांटिकमध्ये 2 लाखाहून अधिक बॅरल्स लो-लेव्हर किरणोत्सर्गी कचरा टाकण्यात आला होता. हा कचरा सुमारे 3000 ते 5 हजार मीटरपेक्षा अधिक खोलवर डंप करण्यात आला होता. चालू वर्षी वैज्ञानिकांनी नॉटाइल नावाच्या सबमर्सिबलद्वारे 20 वेळा समुद्रात डाइव्ह केले आणि 4700 मीटरपेक्षा अधिक खोलवर जात त्यांची तपासणी केली.
वैज्ञानिकांची टीम संशोधन नौका पोरक्वा पा द्वारे नॉटिल सबमर्सिबलद्वारे खोल समुद्रात पाहाचली. टीमने अनेक जुन्या बॅरल्सना थेट पाहिले. याचबरोबर बॅरलच्या आसपासचे पाणी, समुद्रातील माती आणि सागरी जीवांचे नमुनेही मिळविले. बहुतांश बॅरल अत्यंत जुन्या आणि खराब स्थितीत मिळाले. त्यांना गंज चढली होती. काही ठिकाणांवर बॅरलच्या आतील सामग्री बाहेर पडून समुद्राच्या तळावर फैलावलेली दिसून आली. वैज्ञानिक आता या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करत आहेत. जेणेकरून किरणोत्सर्गी पदार्थ आसपासच्या भागात किती फैलावले आहेत हे जाणून घेता येईल.
बॅरलवर चिकटले सागरी जीव
या जुन्या बॅरलच्या आसपास सागरी जीवही आढळून आले. वैज्ञानिकांनी बॅरलवर स्पंज आणि एनेमोन्स सारखे जीव पाहिले. खेकडे आणि इतर छोटे सागरी जीवही त्यांच्या आसपास होते. या जीवांवर किरणोत्सर्गी कचऱ्याचा कोणता प्रभाव पडत आहे की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न संशोधन टीम करत आहे. याकरता पाणी, माती आणि सागरी जीवांचे नमुने मिळविण्यात आले आहेत. त्यांच्या तपासणीतून किरणोत्सर्गी पदार्थ सागरी जीवांपर्यंत पोहोचत आहेत की नाही हे कळणार आहे.
कचरा कुठून आला?
समुद्रात टाकण्यात आलेला हा किरणोत्सर्गी कचरा अनेक ठिकाणांवरून आला होता. यात आण्विक ऊर्जा प्रकल्प, आण्विक इंधनाशी निगडित कार्य, रुग्णालय, संशोधन केंद्र आणि औद्योगिक प्रकल्पाचा कचरा सामील होता. ओएसपीएआरनुसार त्या काळात अशाप्रकारच्या लो-लेव्हल किरणोत्सर्गी कचऱ्याला समुद्रात सोडणे वापरण्यायोग्य पद्धत होती. एकूण 1.5 लाखाहून अधिक सामग्री समुद्रात डंप करण्यात आली हीत. यात सीजियम-137, प्लूटोनिययमचे आइसोटोप आणि ट्रिटियम यासारखे रेडिओन्यूक्लाइड सामील होते. नंतर समुद्रात रेडिओअॅक्टिव्ह कचरा टाकण्यावर बंदी घालण्यात आली होती. 1992 मध्ये नॉर्थ-ईस्ट अटलांटिकमध्ये अशाप्रकारच्या डंपिंगला बंदी आली. यानंतर 1993 मध्ये जगभरात समुद्रात किरणोत्सर्गी कचरा डंप करण्यावर बंदी लागू झाली.
वैज्ञानिक काय शोधणार?
2025 मध्ये नॉडस्समच्या पहिल्या संशोधनादरम्यान समुद्राच्या तळाशी पडलेल्या हजारो बॅरल्सचा शोध घेत त्याचा मॅप तयार करण्यात आला होता. 2026 च्या संशोधनात वैज्ञानि या ठिकाणांपर्यंत पोहोचले आणि तेथून पाणी, माती आणि सागरी जीवांचे नमुने घेऊन आले. आता या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी होणार आहे. इतक्या वर्षांनी या जुन्या बॅरल्समधून किरणोत्सर्गी पदार्थ समुद्राचे पाणी, माती आणि सागरी जीवांपर्यंत पोहोचले की नाही हे वैज्ञानिक जाणून घेणार आहेत. सध्या या जुन्या बॅरल्सची खराब होणाऱ्या स्थितीचा समुद्र आणि तेथल जीवांवर दीर्घकाळत कोणता प्रभाव पडू शकतो हे जाणून घेण्यावर वैज्ञानिकांचा भर आहे.