For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्री गणेशाचे उपासनाशास्त्र

06:28 AM Sep 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
श्री गणेशाचे उपासनाशास्त्र
Advertisement

आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्यो अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्राrय माहिती ज्ञात झाल्यास देवतेप्रती श्रद्धा निर्माण होते. त्यामुळे साधना चांगली होण्यास साहाय्य होते. हा उद्देश लक्षात घेऊन श्री गणेश या देवतेची काही वैशिष्ट्यो आणि तिच्या उपासनेच्या संदर्भातील उपयुक्त अध्यात्मशास्त्राrय माहिती या लेखामध्ये दिली आहे. प्रथम आपण श्री गणेशाचा कार्यारंभी म्हणायचा श्लोक पाहूया.

Advertisement

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ।।

याचा अर्थ आहे, वाकडी सोंड असलेला, मोठ्या देहाचा, कोटीसूर्याप्रमाणे कांती असलेला, अशा हे देवा, तू मला सर्वदा सर्व कार्यांत निर्विघ्न कर. श्री गणेशाच्या या ध्यानमंत्रामध्ये त्याच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन आहे. गणपती हा शब्द गण आणि पती या दोन शब्दांनी बनला आहे. गण याचा अर्थ पवित्रक. पती म्हणजे पालन करणारा. गणपती सूक्ष्मातीसूक्ष्म चैतन्यकणांचा म्हणजे पवित्रकांचा स्वामी आहे. श्री गणेश जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणाऱ्या रजतम लहरींवर नियंत्रण ठेवतो, तसेच लवकर प्रसन्न होतो.

Advertisement

 श्री गणेशाचे कार्य आणि वैशिष्ट्यो

  1. विघ्नहर्ता : विघ्नहर्ता असल्याने लोकनाट्यापासून विवाहापर्यंत, तसेच गृहप्रवेशादी सर्व विधींच्या आरंभी श्री गणेशपूजन असते.
  2. विवेकबुद्धी निर्माण करून चित्त शांत करणारा : श्री गणेश हा ब्रह्मांडातील दूषित शक्ती आकर्षून घेणारा आहे, तसेच मनुष्याच्या बुद्धीमध्ये विवेक निर्माण करणारा आहे. श्री गणेशाच्या उपासनेमुळे विकल्पशक्ती प्रभाव पाडत नाही. बुद्धी स्थिर राहून चित्त शांत राहते. मी कोण, भगवंताने मला या जगतात कशासाठी पाठवले, याची साधकाला जाणीव होऊन तो श्रद्धापूर्वक कार्य करू लागतो. साधकाच्या भावात वाढ होऊन त्याची उत्तरोत्तर प्रगती होऊ लागते. - प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, पनवेल.
  3. संगीत आणि नृत्य यात प्रवीण असलेला : स्वरब्रह्माचा आविष्कार म्हणजे ओंकार. श्री गणेशालाही ओंकारस्वरूप श्री गणेशा असे म्हटले आहे. श्री गणेश वरदस्तोत्रातील अनेक श्लोकांवरून गणेशाचे संगीताशी असलेले नाते स्पष्ट होते. ज्ञानेश्वरमाउली, संत नामदेव, समर्थ रामदासस्वामी आदी संतांच्या अभंगरचनांतूनही गणेशाचा संगीताशी असलेला निकटचा संबंध लक्षात येतो. नर्तकरूपातील गणरायाच्या मूर्तीही आढळतात. सोनेरी देहकांतीच्या या गणपतीला आठ हात असून त्याचा डावा पाय पद्मासनात आहे, तर उजवा पाय अधांतरी आहे. मध्व मुनीश्वरांनी ये गणराया मंगलमूर्ति । पतित पावन दीनदयाळा । त्रिभुवनी सोज्वळ तुझी कीर्ती । कीर्तनरंगी नृत्य करी रे, संगीताची मिळवूनी पूर्ती?, अशी श्री गणेशाच्या नृत्यसंपदेची महती वर्णिली आहे.
  4. वाक्देवता : गणेश प्रसन्न झाला की, वाक्सिद्धी प्राप्त होते.

कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन करण्याचे महत्त्व: गणपती हा दहा दिशांचा स्वामी आहे. त्याच्या अनुमतीविना इतर देवता पूजास्थानी येऊ शकत नाहीत. गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की, ज्या देवतेची आपण पूजा करत असतो, ती तेथे येऊ शकते; म्हणून कोणतेही मंगल कार्य किंवा कोणत्याही देवतेची पूजा करताना प्रथम गणपतीचे पूजन करतात. गणपतीच्या पूजनामुळे शुभकार्यात येणारी विघ्ने दूर होतात. गणपतीने मानवाच्या नादभाषेचे देवतांच्या प्रकाशभाषेत रूपांतर केल्यामुळे आपल्या प्रार्थना देवतांपर्यंत पोहोचतात. श्री गणेश हे सर्व संतांनी गौरविलेले आराध्यदैवत आहे. निरनिराळ्या साधना मार्गांतील संत वेगवेगळ्या देवतांचे भक्त असले, तरी सर्व संतांनी श्री गणेशाची आळवणी आणि त्याचे स्तवन आवर्जून केले आहे. मराठी संतवाङ्ममयातून तर श्री गणेशाचे लौकिक आणि पारलौकिक स्वरूपाचे वर्णन मोठ्या सुबकरित्या केलेले आढळते.

 डाव्या सोंडेचा गणपति अध्यात्माला पूरक असणे!

पूजेत शक्यतो डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा. उजव्या सोंडेचा गणपती हा अतिशय शक्तीशाली आणि जागृत आहे, असे म्हटले जाते. पूजेत उजव्या सोंडेचा गणपती असल्यास कर्मकांडातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून दैनंदिन पूजाविधी पार पाडावे लागतात. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कर्मकांडातील नियमांचे काटेकोरपणे पालन करणे शक्य होत नसल्याने पूजाविधीमध्ये चुका होतात आणि त्याचा आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते.

श्री गणेशाच्या पूजेत तांबड्या रंगांच्या वस्तू असण्याचे कारण : तांबड्या रंगात गणेशतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे मूर्ती अल्पावधीत जागृत होण्यास साहाय्य होते. यासाठीच श्री गणेशाच्या पूजेत रक्तचंदन वापरतात.

श्री गणेशाला लाल फुले वाहणे : श्री गणेशाला तांबड्या जास्वंदाची फुले वहावीत. श्री गणेशाला फुले वाहताना ती 8 किंवा 8 च्या पटीत आणि शंकरपाळ्याच्या आकारात वहावीत. शंकरपाळ्याच्या आकारात फुले वाहताना दोन लहान कोन एका सरळ रेषेत देवतेच्या समोर येतील आणि मोठे दोन कोन दोन बाजूंना दोन राहतील, अशा पद्धतीने फुले वहावीत. जास्वंद वा अन्य लाल फूल वाहतांना देठ श्री गणेशाच्या चरणांकडे आणि तुरा आपल्याकडे येईल, असे वाहावे.

श्री गणेशाला दूर्वा वाहणे: दूर्वांमध्ये श्री गणेशाचे तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अत्याधिक प्रमाणात असते. श्री गणेशाला दूर्वा नेहमी विषम संख्येने (न्यूनतम 3 किंवा 5, 7, 21 इत्यादी) वाहाव्यात. श्री गणेशाला वाहायच्या दूर्वा नेहमी कोवळ्या असाव्यात. दूर्वांना 3, 5, 7 अशा विषम संख्येच्या पात्या असाव्यात. दूर्वा वाहतांना पात्यांचा भाग आपल्याकडे आणि देठाचा भाग श्री गणेशाच्या मूर्तीकडे असावा. त्यामुळे श्री गणेशाचे तत्त्व आपल्याकडे प्रक्षेपित व्हायला साहाय्य होते.

शमीची आणि मंदारची पत्री वाहणे : शमीमध्ये अग्नीचा वास आहे. आपली शस्त्रs तेजस्वी रहावीत म्हणून पांडवांनी ती शमीवृक्षाच्या ढोलीत ठेवली होती. मंथन करून ज्यावेळी अग्नी काढतात, तो मंथा शमीवृक्षाचा असतो. मंदार हे वानस्पत्य रसायन आहे.

श्री गणेशाच्या तारक आणि मारक तत्त्वाप्रमाणे वापरायच्या उदबत्ती : श्री गणेशाची पूजा करतांना त्याचे तारक तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करण्याकरता चंदन, केवडा, चमेली आणि वाळा यांपैकी कोणत्याही गंधाच्या उदबत्त्या वापराव्यात.

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘गणपती’

श्री. आबासाहेब सावंत, सनातन संस्था

Advertisement
Tags :

.