महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सर्वात भीतीदायक पूल

06:37 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्पर्श करण्यासही घाबरतात लोक

Advertisement

जगात पूल तयार करताना प्रवाशांना तो ओsलांडताना असुरक्षित वाटू नये याची काळजी घ्यावी लागते. तरीही अनेक पूल किंवा ब्रिज हे ओलांडताना लोक घाबरत असतात. अशाप्रकारचे पूल उंच पर्वतांमध्ये अधिक दिसून येतात. हे पूल केवळ पायी चालूनच ओलांडता येतात. अशाच प्रकारचा एक पूल उत्तर आयर्लंडचा कॅरिक अ रेडे रोप ब्रिज असून तो जगातील सर्वात भीतीदायक ब्रिज मानला जातो.

Advertisement

हा ब्रिज इतका भीतीदायक आहे की यावर अनेक लोक त्याला स्पर्श न करताच परत जातात. याचे नाव कॅरिक अ रेडे रोप असल्याने हा दोरखंडाचा पूल असल्याचे स्पष्ट आहे. हा पूल अटलांटिक महासागराच्या दोन पुलांना जोडण्याचे काम करतो.

हा पूल समुद्रसपाटीपासून 30 मीटर उंच असून तो 250 वर्षांपूर्वी एका सालोमन मच्छिमाराने तयार केला होता. आता यावर द नॅशनल ट्रस्टचा मालकी हक्क असून त्याच्याकडूनच याची देखभाल केली जाते. लोक हा पूल पायी ओलांडू शकतात. तेथून जात ते कॅरिक अ रेडे बेटावर जाऊ शकतात. तेथे एका मच्छिमाराची झोपडी आहे.

या ब्रिजला जगातील 18 सर्वात भीतीदायक पुलांच्या यादीत सामील करण्यात आले आहे. हा ब्रिज ओलांडणारे लोक परत तेथून प्रवास करणे टाळतात आणि ते परत येण्यासाठी नौकेची मदत घेतात. याचमुळे हा ब्रिज जितका सुरक्षित आहे, त्याहून अधिक धोकादायक किंवा भीतीदायक वाटतो.

पूर्वी या ब्रिजचा वापर केवळ मच्छिमारच करायचे. सालोमन माशांना पकडण्यासाठी मच्छिमार हा पूल ओलांडत होते. नॅशनल ट्रस्टने आता या ब्रिजला दोन हँडरेल लावून मजबूत केले आहे. यामुळे हा ब्रिज आता तांत्रिकदृष्ट्या पार करण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आणि मजबूत देखील मानला गेला आहे. परंतु हा ब्रिज ओलांडताना मोठ्या प्रमाणात हलतो, यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होते. खराब हवामानात ट्रस्टच या ब्रिजवरी वाहतूक रोखते. हा ब्रिज ओलांडणे साहसाचे काम आहे यात दुमत नाही. परंतु हा ब्रिज ओलांडल्यावर लोकांना सुंदर दृश्य दिसून येते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article