भूलथापांना विटलेली जनता भाजप सरकारचा कडेलोट करणार : डॉ. नंदाताई बाभूळकर
भाजप सरकारच्या भूलथापांना जनता आता विटली आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप सरकारचा जनता कडेलोट करणार हे निश्चित, असा विश्वास डॉ. नंदाताई बाभूळकर यांनी केला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी चंदगड तालुक्यातील मलगेवाडी, बोंजुर्डी, अडकूर, गणुचीवाडी या गावांचा दौरा केला. त्यावेळी मतदारांशी संवाद साधताना डॉ. बाभूळकर पुढे म्हणाल्या, चंदगडमध्ये काजूचे दर 160, 140 रुपयेवरून 80 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. गॅसचे दर 400 वरून 1100 रूपयांवर पोहोचले आहेत. खतांचे दरात मोठी वाढ झाली आहे. विजेच्या दरात 12 टक्के दरवाढीचा फटका लवकरच सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. असे हे भाजपचे भाजपचे फसवे सरकार पराभूत करा.
गावागावांत महिलांनी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. तसेच त्यांनी अडकूर येथे बबनराव देसाई, बाबा अडकूरकर, जयवंत अडकूरकर, रत्नप्रभा अडकूरकर, राहुल देसाई अडकूरकर, धोंडीबा दळवी, डॉ. मलिक बाबालाल चिंचणेकर यांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. यावेळी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी शिव-शाहुंचा विचार आणि विकासाची दूरदृष्टी असलेल्या शाहू छत्रपती यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
या प्रचार दौर्यास संभाजीराव देसाई, राजश्री देसाई, विद्या पाटील, रूपाताई खांडेकर, नंदिनी पाटील, अनिता भोगण, संतोष सुतार, अनिल दळवी, शिवाजी सावंत, नितीन फाटक, दीपा पाटील, शांता जाधव, डॉ. विजयकुमार कांबळे, अशोक जाधव, सागर पाटील, राहुल देसाई, राधिका शिवगोंडे, साधना शिवगोंडे, सारिका पाटील, संगीता गुडवळेकर, सुलाबाई सुतार, डॉ. सदानंद गावडे, सूरज माने, एकनाथ वाके, गणेश बागडी, संतोष पाटील आदीसह कार्यकर्ते, महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.