सॅमसंग गॅलक्सी एस 27 अनेक सुविधांसोबत येणार
200 मेगापिक्सलचा दमदार कॅमेरा, 7 हजार एमएएचची बॅटरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्मार्टफोन कंपनी सॅमसंग आता लवकरच त्यांचा नवा गॅलक्सी एस 27 स्मार्टफोन लाँच करणार आहे, अशी माहिती मिळते आहे. मात्र भारतीयांना सदरचा फोन येण्यासाठी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. तब्बल 200 एमपी कॅमेऱ्यासह 7 हजार एमएएचची दमदार बॅटरी या नव्या फोनमध्ये असेल, असे म्हटले जात आहे.
3 प्रकारात होणार सादर
सॅमसंगचा नवा गॅलक्सी एस 27, एस 27 अल्ट्रा व एस 27 प्लस असे तीन स्मार्टफोन सादर केले जाणार आहेत. यासंबंधीची वैशिष्ठ्यो नुकतीच उघड करण्यात आली आहेत. यात एस 27 अल्ट्रा हा मागच्या बाजुस 4 कॅमेऱ्यांसह 200 मेगापिक्सलच्या मेन कॅमेरासह येणार आहे. यात पुन्हा 50 एमपीचा टेलिफोटो कॅमेरा, 50 एमपीचा अल्ट्राव्हाइड अँगल कॅमेरा व 10 एमपी टेलिफोटो कॅमेरा असेल. सेल्फी व व्हिडीयो कॉलसाठी 12 एमपीचा फ्रंट कॅमेराही असेल. 6.9 इंचाचा अमोलेड 2 एक्स डिस्प्ले दिला असून क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 इलाइट जन 6 प्रोसेसरवर फोन चालणार आहे. स्टोरेजचा विचार केल्यास 12 जीबी रॅम व 256 जीबी इंटर्नल स्टोरेज असेल. 7 हजार एमएएच क्षमतेची बॅटरी यात आहे.
भारतात कधी होणार सादर
सॅमसंगचा गॅलक्सी एस 27 अल्ट्रा फेब्रुवारी 2027 मध्ये भारतात लाँच केला जाऊ शकतो. 256 जीबी स्टोरेजचा एस 27 अल्ट्रा 12 जीबीचा फोन 1 लाख 42 हजार ते 1 लाख 47 हजार रुपयांच्या घरात मिळू शकतो.