Kolhapur hooch tragedy | दारूभट्टया त्याच, दारू तीच आणि कारवाई करणारे तेच
पुणे विषारी दारू प्रकरणानंतर कोल्हापुरातील ‘व्होल्टम’ दुर्घटनेची आठवण ताजी
कोल्हापूर ( सुधाकर काशीद ) -पुण्यात विषारी दारू प्यायल्यामुळे १६ जणांचा मृत्यू झाला. खूप मोठे बादळ उठले आहे. पण कोल्हापुरात पस्तीस वर्षांपूर्वी अशीच घटना घडली होती. त्यात विषारी दारूमुळे नोंद झालेले ११ मृत्यू, पण त्याहून अधिक नोंद न झालेल्या मृत्यूच्या घटना होत्या. व्होल्टम विषारी दारू प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले. काही महिने कोल्हापुरातल्या गावठी दारू भट्ट्या बंद झाल्या. पण त्यानंतर त्या पुन्हा सुरू झाल्या.
आता पुण्यातविषारी दारूची घटना घडल्यानंतर त्या पुन्हा उद्ध्वस्त करण्यात आल्या. आणि एखादी मोठी भीषण घटना घडल्यानंतरच राज्य उत्पादन शुल्क जागे होणार काय, अशाच खूप संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटू लागल्या.कोल्हापुरात गावठी दारू हा प्रकार अजिबात नवा नाही. कोल्हापुरातला विशिष्ट परिसर म्हणजे दारू गाळणाऱ्या भट्टयांचा परिसर अशीच त्यांची ओळख आहे. या भट्ट्या अजिबात लपून-छपून नाहीत.
अगदी उघड्यावर धुराचे लोट आकाशातसोडत या भट्ट्या धगधगत असतात. अधून-मधून कारवायाही होतात, पण
तोच परिसर, तेच ठिकाण, तेच बॅरेलचे ढीग, तेच रसायन, तोच कुजलेला गूळ काही गंभीर घडले तरच कारवाई
कोल्हापुरातील व्होल्टम विषारी दारू घटनेला उजाळाआणि तेच तेच गावठी हातभट्टीवाले यांच्या वरच्या कारवाईची छायाचित्रे प्रसिद्धीस दिली जातात. बास्तबिक गावठी दारू म्हणजे विष. पण किती बिनधास्तपणे हे विष गाळले जाते आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग त्यांच्याकडे सर्व कुंडली असूनही कसेदुर्लक्ष करते याची प्रचितीच राज्य उत्पादन शुल्क विभाग वेळोवेळी देत राहिले आहे. आता पुण्यात घडलेल्या घटनेनंतर आणखी काही दिवस ही कारवाई चालू राहणार आहे. त्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या... अशीच परिस्थिती असणार हे देखील नागरिकांना पक्के माहित आहे.
संजय भाटिया यांच्यामुळे प्रकरण तडीस
कोल्हापुरातील होल्टम या विषारी दारूची दुर्घटना घडल्यानंतर, तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक कल्लूर व कांबळे यांची तत्काळ बदली करण्यात आली होती. तत्कालीन प्रभारी प्रांताधिकारी संजय भाटिया यांनी हे प्रकरण तडीस लाबले होते. आयएएस झाल्यानंतर त्यांनी पहिलाच प्रभारी कार्यभार कोल्हापुरात स्वीकारला होता.