सहस्रचंडी अनुष्ठान सोहळ्यात कुंकूमार्चन ठरले लक्षवेधी
शिरोडा (प्रतिनिधी) -
शिरोड्यात सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळ्यात महिलांसाठी खास असलेल्या कुंकुमार्चन कार्यक्रमास महिला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. दरदिवशी 128 महिला या प्रमाणे सलग तीन दिवस हा खास कार्यक्रम होत असुन बुधवारी सकाळी 9 वाजता या कार्यक्रमाची सुरवात झाली.शिरोडा येथील श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी श्रीदेवी माऊली मंदिरात 55 ब्राह्मणामार्फत सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळा अंतर्गत मंत्रोपच्चाराने धार्मिक कार्यक्रम सुरु असल्याने मंदिर व परीसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.तब्बल १६ वर्षानंतर शिरोडा गावात श्रीदेवी माऊली पंचायतन देवस्थान आज ४ ते १२ मार्च या कालावधीत भव्य दिव्य अशा स्वरूपात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेला "सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळा' साजरा होत आहे. या उत्सवानिमित्त गावात सर्वत्र धार्मिक वातावरण पाहायला मिळत आहे.सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळा समितीचे अध्यक्ष राजन शिरोडकर, कार्याध्यक्ष मयुरेश शिरोडकर, सचिव नारायण उर्फ नंदू परब, खजिनदार नंदकुमार परब यांनी हा उत्सव नियोजन पुर्ण होण्यासाठी विविध कमिट्यांची स्थापना केलेली असून या कमिट्यांच्या माध्यमातून वाटून दिलेल्या कामाप्रमाणे उत्कृष्ट नियोजनातून परीसरात सेवा दिली जात आहे.या श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळ्यासाठी यावर्षीचे विश्वस्त अशोक गोपाळ परब, विजय गुणाजी गावडे, संदीप मोहन परब, सदानंद पुंडलिक हाडकी, अनंत घनश्याम नाबर हे देवस्थानचा कारभार पाहत आहेत. आज बुधवारी शिरोडा गावातील खासबाग येथील महिलांनी चंद्रकोर रंगाची साडी तर मसूरकरवाडी येथील महिलांनी पोपटी रंगाच्या साड्या परिधान करीत आज मंदिर परिसरातील जेवण नातं माऊली देवीच्या परिसरातील सेवा पार पाडली. बुधवार दि.५ मार्च २०२५ सकाळी ९ ते दुपारी १२.३० कुंकुमार्चन हा महिलांचा खास कार्यक्रम महिलांच्या नोंदणीने उत्स्फूर्त वातावरणात संपन्न होत आहे. तसेच सकाळी ८.०० वा. प्रारंभ सहस्त्रचंडी अनुष्ठान सप्तशती पाठ वाचन, मंगलाचरण शांतीपाठ प्राकारशुद्धी स्थापित देवता पूजन, कुमारीका पूजन, सुवासिनी पूजन, श्री देवी माऊली ऋग्वेद संहिता अभिषेक (विशेष पंचामृतादि अभिषेक) आरती, तीर्थप्रसाद, यानंतर आरती करून उपस्थितीत भाविकांनी नैवेद्याचा लाभ घेतला. तर सायंकाळी 4 वाजता हॉटेल मेघदूत रिक्षा स्टॅन्ड आणि मारुती मंदिर परिसर व्यापारी बंधू यांच्या नियोजनातून श्रीदेवी माऊली मातेस ओट्या घेऊन जाण्याचा कार्यक्रम वाजत गाजत पार पडला. सायंकाळी 5 वाजता पंडित अजित कडकडे यांनी शब्दबद्ध केलेली भक्तीगीते गायक श्रीराम दीक्षित, रविंद्र पळशीकर आणि सहकारी यांनी सादर केली. रात्री 8 वाजता महाआरती व 9.30 वाजता वालावलकर दशावतारी मंडळाचे कष्ट भंजन मारुती हे दशावतारी नाटक, रात्री देऊळवाडीतील नागरिक भाविकांनी भजन जागर केला. शिरोडा येथील श्रीदेवी माऊली मंदिरात होणाऱ्या सहस्त्रचंद्र अनुष्ठान सोहळ्यास रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे डिस्टिक गव्हर्नर शरद पै, असिस्टंट गव्हर्नर महादेव पाटकर, झोनल सेक्रेटरी राजेश घाटवळ, रोटरी शिरोडा प्रेसिडेंट जनार्दन पडवळ, सेक्रेटरी राजन शिरोडकर, सचिन गावडे, भालचंद्र दीक्षित, सागर गडेकर, नंदू परब, दत्तात्रय भोसले, रत्नदीप मालवणकर, अतुल ओटवणेकर, डॉ. सचिन गायकवाड, अक्षय डोंगरे तसेच उद्योजक रघुवीर उर्फ भाई मंत्री सुप्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी यांचे पुतणे सचिन दळवी, यांनी आज भेटीत देऊन शुभेच्छा दिल्या.