For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजप संविधान बदलणार ही अफवा !

03:26 PM Apr 30, 2024 IST | अनुजा कुडतरकर
भाजप संविधान बदलणार ही अफवा
Advertisement

भाजप अनुसूचित जाती मोर्चाचा महाविकास आघाडीवर निशाणा

Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

भाजप संविधान बदलणार असा खोटा प्रचार महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून तसेच लोकसभेचे उमेदवार खा . विनायक राऊतांकडून केला केला जात आहे. कुठल्याही परिस्थितीत संविधान आणि घटना बदलली जाणार नाही आणि असा खोटा प्रचार करून जर आमच्या समाजातील लोकांना भडकवण्याचे काम करत असाल तर याद राखा. या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे विजयी होणारच आहेत. महाविकास आघाडीचे पुढारी आणि उमेदवार विनायक राऊत भाजप संविधान बदलणार अशी खोटी अफवा पसरवत आहेत. आम्ही आता गप्प बसणार नाही असे पत्रकार परिषदेत भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत जाधव व अनंत आसोलकर, सोनिया मटकर आदींनी संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. श्री राणे साडेतीन लाखाच्या फरकाने निवडून येतील असा विश्वासही श्री जाधव यांनी व्यक्त केला. यावेळी राजेश चव्हाण ,प्रकाश कदम, संजय निगुडकर, श्री कासले आदी उपस्थित होते. बौद्ध समाज ,चर्मकार हे सर्व अनुसूचित जाती जमातीचे सर्व बांधव श्री राणे यांच्या पाठीशी आहेत असेही ते म्हणाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.