For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पतपेढीच्या आर्थिक स्थैर्याच्या मुद्द्यावर सत्तारूढ गटाची बाजी

01:26 PM Jan 11, 2024 IST | Kalyani Amanagi
पतपेढीच्या आर्थिक स्थैर्याच्या मुद्द्यावर सत्तारूढ गटाची बाजी
Advertisement

मोठ्या शाळातील उमेदवारीचा फायदा: स्वाभिमानी सहकार आघाडीची शर्थीची झुंज

Advertisement

सांगरुळ प्रतिनिधी

संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या .कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीने १७ पैकी १७ जागा जिंकत निर्विवाद सत्ता मिळवली .

Advertisement

अडचणीत असलेल्या पतपेढीचा सात वर्षात कारभार सुधारत संस्थेला आर्थिक स्थैर्य प्राप्तकरून दिले .चांगल्या चाललेल्या संस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सभासदांची सुरुवातीपासून इच्छा होती. तरीही निवडणूक लागली पण सभासदांनी संस्थेच्या प्रगतीच्या मुद्द्यावर सत्तारूढ गटाला साथ दिली. विरोधी दादासाहेब लाड यांच्या स्वाभिमानी सहकार आघाडीने शर्थाची झुंज दिली .यामध्ये कोजिमाशि पतसंस्थेच्या संचालक मंडळाचे सहकार्य विरोधी आघाडीला मोलाचे ठरले.

करवीर तालुका व कोल्हापूर शहरात सर्वाधिक सभासद आहेत येथील मतदार तसेच कागल तालुक्यातील सुखाणू कमिटीने एकमताने दिलेले उमेदवार .मोठ्या शाळांना दिलेली उमेदवारी या बाबी सत्तारूढ गटाला पोषक ठरल्या .मतदार संख्येच्या प्रमाणात उमेदवार देताना समतोल राखण्याचा फायदाही सत्तारूढ गटाला झाला . सर्वच तालुक्यातून सतारुढ आघाडीला चांगली साथ मिळाली.

करवीर तालुक्यात सभासद संख्या जास्त असल्याने विरोधी गटाने तालुक्यात पाच उमेदवार दिलेत तसेच मुळचे करवीर मधील व इतर तालुक्यात सेवेत असणारे चार असे एकूण नऊ उमेदवार देऊन आमदार असगावकर यांच्या होम पिचवर आव्हान देण्याचा प्रयत्न केला. यामुळे इतर ठिकाणी उमेदवार नसल्याने त्याचाही फटका विरोधी आघाडीला बसल्याची चर्चा सभासद वर्गातून होत आहे.

विरोधी गटाने प्रचार सभातून आमदार आसगावकर यांना टारगेट करण्याचा प्रयत्न केला.पण आमदार असगावकर यांनी नेहमीप्रमाणेच संयम राखत विरोधकांच्यावर टीका न करता पतपेढीच्या कारभारावर प्रचारात अधिक भर दिला .आणि बेरजेचे राजकारण करत एक हाती सत्ता मिळवत संस्थेवर वर्चस्व कायम राखले .आक्रमक कार्यकर्त्यांनाही वारंवार आवर घालत संयमाने प्रचार यंत्रणा राबवत निवडणूक जिंकण्यात त्यांना यश आले.

पूर्णपणे आर्थिक अडचणीत असलेली पतपेढी सात वर्षात पारदर्शी व काटकसरीचा कारभार करून प्रगतीपथावर आणण्याचे काम सत्तारूढ गटाने केले आहे . ५० हजार शेअर्स रकमेवर १७ टक्के डीव्हीडंड नऊ टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा दिपावली भेटवस्तू बरोबरच सभासदांना दिलेल्या विविध सुविधा याचा लाभ सत्तारूढ गटाला झाला.

विरोधकांनी पतपेढीचा शाखा विस्तार व नोकर भरती तोफ डागण्याचा प्रयत्न केला .पण सभासदांच्या सोयीसाठी शाखा विस्तार गरजेचा होता .तसेच शाखातून झालेला नफा याबाबत विश्लेषण करत सभासदांना पटवून देण्यात सत्तारूढ गटाला यश आले. सत्तारूढ गटाला कृती समितीचे बाबा पाटील एस डी लाड वसंतराव देशमुख उदय पाटील के के पाटील किरण पास्ते संजय पाटील व्ही जी पोवार एच आर पाटील शंकरराव संकपाळ एस डी जरग विनाअनुदानितचे सुनिल कल्याणी यांची मोलाची साथ लाभली . जुनी पेन्शन योजना कोर कमिटीनेही सत्तारूढ आघाडीला पाठबळ दिले .

विरोधी दादासाहेब लाड यांना खंडेराव जगदाळे बी जी बोराडे कृती समितीचे दत्ता पाटील सविता पाटील के जी पवार मनोहर पाटील पतसंस्थेचे चेअरमन बाळ डेळेकर राजेंद्र रानमाळे यांच्यासह कोजिमाशी पतसंस्थेचे सर्व संचालक यांची साथ लाभली .कोजिमाशि पतसंस्थेचे माजी संचालक समीर घोरपडे यांनी शेवटच्या टप्प्यात दिलेला पाठिंबा तसेच पतपेढीचे माजी चेअरमन विलास साठे यांनी प्रचार शुभारंभानंतर दिलेला छुपा व अंतिम टप्प्यात दिलेला उघड पाठिंबा विरोधी स्वाभिमानी सहकार आघाडीच्या मतांच्या बेरजेत वाढ करण्यास कारणीभूत ठरला .

मुख्याध्यापक संघाच्या निवडणुकीचीही किनार या निवडणुकीला लागल्याने तसेच अस्तित्वाची लढाई असल्याने दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार यंत्रणा राबवली गेल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष निवडणुकीकडे लागले होते .अखेर स्वच्छ कारभाराच्या जोरावर आमदार आसगावकर यांनी बाजी मारत संस्थेवरील वर्चस्व अबाधीत राखले.

अंगठीसम दिसणाऱ्या चिन्हाचा परिणाम

सर्वसाधारण गटात नामदेव पांडुरंग पाटील या अपक्ष उमेदवाराचे तर भटक्या जमाती गटात सत्यविजय रामचंद्र नलावडे यांचे चिन्ह अंगठी सारखे दिसणारे होते . सर्वसाधारण गटात ९८ तर भटक्या जाती गटात ५९ मते बाद झालीत .इतर गटात बाद मतांची प्रमाण तुलनेने खूप कमी आहे .याचाही परिणाम सत्तारूढ गटाच्या मताधिक्यावर झाल्याची चर्चा मतमोजणी केंद्रावर होती . हा फटका सतारूढ गटाला बसला नसता तर मताधिक्यात वाढ झाली असती .

निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणणारा मोठा वर्ग

मुख्याध्यापक संघाच्या सत्ता संघर्षात संघाची व शिक्षण क्षेत्राची होणारी बदनामी थांबावी यासाठी जिल्ह्यातील सर्व नेते मंडळींनी मुख्याध्यापक संघाची निवडणूक बिनविरोध करावी अशी अपेक्षा बहुतांशी मुख्याध्यापक व शिक्षक वर्गातून व्यक्त होत आहे . ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अडथळा येऊ नये म्हणूून तसेच प्रगतीपथावर असलेल्या पतपेढीची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा बहुसंख्य मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यातून व्यक्त होत होती .

Advertisement
Tags :

.