राजघराण्याने बजावला मतदानाचा हक्क !
सावंतवाडी | प्रतिनिधी
कुठलीही निवडणूक असो सावंतवाडीत अनेक नेते ,पुढारी ,पदाधिकारी हे सावंतवाडी संस्थांनच्या राजघराण्याचा आशीर्वाद घेतात आणि मतदान करतात. यावेळी मात्र ,सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राजघराण्याच्या सुनबाई श्रद्धा सावंत भोसले या निवडणुकीला सामोरे जात आहेत. मतदानादिवशी खासकीलवाडा येथील शाळा क्रमांक ४ या मतदान केंद्रावर सावंतवाडी संस्थांनच्या राजघराण्याने एकत्रित येत रांगेत उभे राहत मतदानाचा हक्क बजावला आहे.. राजघराण्याच्या व्यक्तीला पहिल्यांदाच मतदान करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी सावंतवाडी संस्थानचे खेम सावंत भोसले, युवराज लखम सावंत भोसले , शुभदा देवी भोसले, श्रद्धा सावंत भोसले आणि उर्वशी सावंत भोसले यांनी मतदान केले. मतदान करून लोकशाही बळकट करूया असे ते म्हणाले. सावंतवाडी 21 केंद्रावर आज सकाळी गर्दी झाली होती. प्रभाग क्रमांक सातच्या केंद्रावर पोलीस यंत्रणेसोबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत केंद्राजवळ अनोळखी व्यक्ती येत असल्याची तक्रार केली. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण होते. बाकी सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया सुरू होती.