For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाकुंभच्या शाहीस्नानाला अमृत स्नान संबोधिले जाणार

06:19 AM Jan 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
महाकुंभच्या शाहीस्नानाला अमृत स्नान संबोधिले जाणार
Advertisement

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रयागराजमध्ये घोषणा : तयारीचा घेतला आढावा

Advertisement

वृत्तसंस्था/ प्रयागराज

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी प्रयागराजचा दौरा केला आहे. या दौऱ्यात त्यांनी सर्वप्रथम नैनी येथील बायो सीएनजी प्रकल्पाचे अनावरण केले आणि फाफामऊ येथील स्टीलब्रिजचे उद्घाटन केले. यानंतर महाकुंभच्या तयारींचा आढावा घेतला आहे. नदीवरील घाटांची पाहणी करत गंगाजलचे आचमनही त्यांनी केले. यानंतर झालेल्या एका बैठकीत कुंभमेळ्यातील शाही स्नानाला अमृत स्नान म्हणून संबोधिण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

Advertisement

बडे हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यावर योगी आदित्यनाथ यांनी मेळा प्राधिकरणाच्या सभागृहात अधिकाऱ्यांसोबत समीक्षा बैठक घेतली. यादरम्यान दीर्घकाळापासून संतांकडून शाही स्नानाच्या नव्या नामकरणच्या मागणीचे आठवण त्यांनी करून दिली. तसेच महाकुंभमध्ये शाही स्नान आता अमृत स्नान म्हणून ओळखले जाणार असल्याची घोषणा केली आहे.  तर रेल्वे प्रशासन कुंभमेळ्यासाठी 150 विशेष रेल्वेगाड्या सोडणार आहे.

200 रस्त्यांचे काम पूर्ण

बैठकीदरम्यान कुंभ मेळा अधिकारी विजय किरण आनंद यांनी महाकुंभच्या कार्यांविषयी विस्तृत माहिती दिली आहे. सुमारे 200 रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून यात फ्लायओव्हरचे काम देखील सामील आहे. शहर आणि बसस्थानक, रेल्वेस्थानकावर होल्डिंग एरिया निर्माण करण्याचे काम पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. मेळा क्षेत्रात दोन ते तीन किलोमीटर अंतरावर पार्किंगसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. पांटुन ब्रिज 30 च्या संख्येत तयार करण्यात आले असून 28 पूर्णपणे तयार आहेत. 12 किलोमीटर लांबीचा तात्पुरता घाट देखील तयार झाला आहे. चकर्ड प्लेट 530 किलोमीटरच्या कक्षेत पसरविण्यात आले आहेत. शुद्ध पेयजलासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून सात हजारांहून अधिक संस्थांची मदत घेतली जात आहे. तर दीड लाखाहून अधिक तंबू उभारले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

विशेष व्यवस्था

कुंभमेळ्यादरम्यान पवित्र स्नानादरम्यान दुर्घटना होऊ नये म्हणून वॉटर रोबोटचा वापर केला जाणार आहे. तर सुरक्षेकरता 7 चक्र तयार करण्यात आले असून वेगवेगळ्या सुरक्षाचक्रात कमांडोही तैनात असणार आहेत. महाकुंभमध्ये 151 फूट उंचीचे त्रिशूळ साकारण्यात आले आहे. महाकुंभमध्ये येणाऱ्या भाविकांकरता ड्रोन शो आयोजित केला जाणार आहे. तसेच महाकुंभदरम्यान पौराणिक कथा प्रदर्शित केल्या जाणार आहेत.

Advertisement
Tags :

.