For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय अर्थव्यवस्थेत ‘एआय’ची भूमिका महत्त्वाची

07:00 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय अर्थव्यवस्थेत ‘एआय’ची भूमिका महत्त्वाची
Advertisement

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला : एआय क्रांतीपासून अलिप्त न राहता स्वीकार करण्याचाही दिला सल्ला 

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

मायक्रोसॉफ्टचे चेअरमन आणि सीईओ सत्या नडेला यांनी भारतीय उद्योगांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) क्रांतीपासून अलिप्त न राहता त्याचा स्वीकार करण्यास सांगितले आहे. त्यांनी भारतीय कंपन्यांना वापर करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करत केवळ अभ्यासावर अवलंबून न राहता एआयमधील त्यांच्या प्रयत्नांना गती देण्याचे आवाहन केले. नडेला दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. एआय हे नवीन शक्तिशाली तंत्रज्ञान आहे आणि ते जगाच्या कानाकोपऱ्यात झपाट्याने पसरवण्याची गरज आहे, जेणेकरून प्रत्येकाला आर्थिक विकासाचे समान लाभ मिळू शकतील, असे त्यांचे मत आहे. सध्याच्या एआय क्रांतीची तुलना पर्सनल कॉम्प्युटरच्या (पीसी) युगाशी करताना, नडेला म्हणाले, ‘मला वाटते एआयचे युग पीसीच्या युगासारखे आहे. पीसीने आमच्या बोटांच्या टोकापर्यंत माहिती आणली तर एआयने कौशल्य तुमच्या बोटांच्या टोकापर्यंत आणले. ण्दझ्ग्त्दू सह उत्पादकता वाढल्याने हे स्पष्टपणे दिसून येते. उदाहरणार्थ, मायक्रोसॉफ्टने 365 साठी ण्दझ्ग्त्दू च्या सुरुवातीच्या वापरकर्त्यांवर अलीकडील संशोधनात ते 29 टक्के जलद असल्याचे दिसून आले आहे.

Advertisement

भारतातील इतर सीईओंना संबोधित करताना...

एआयचे परिणाम पाहण्यासाठी प्रतीक्षा करण्याऐवजी एआय स्वीकारण्याची गरज यावर ते 35 मिनिटे बोलले. नडेला यांनी असेही जाहीर केले की मायक्रोसॉफ्ट 2025 पर्यंत भारतातील 2 दशलक्ष लोकांना एआय कौशल्याच्या संधी प्रदान करेल. नडेला म्हणाले की, एआय देशातील जीडीपी वाढीचा दर वाढविण्यात मदत करू शकते. ते म्हणाले की, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे. ते म्हणाले की तंत्रज्ञानाच्या जगात घडत असलेल्या चार मोठ्या बदलांचा विचार केला तर-पीसी, क्लायंट सर्व्हर, इंटरनेट आणि मोबाइल आणि क्लाउड - आणि जेव्हा भारत आणि जगामध्ये एआयचा अवलंब करण्याचा विचार येतो, तेव्हा फारसा फरक नाही.

Advertisement
Tags :

.