For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुळगा (हिं.) नाल्यापासून रस्ता डांबरीकरणाला सुऊवात

12:24 PM Nov 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुळगा  हिं   नाल्यापासून रस्ता डांबरीकरणाला सुऊवात
Advertisement

अत्यंत खराब रस्त्यातील खड्डे बुजविणे-डांबरीकरण कामाला प्रारंभ

Advertisement

वार्ताहर /उचगाव

बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील बेळगाव ते बाची या पट्ट्यातील झालेल्या रस्त्याच्या दुर्दशेबाबत या भागातील अनेक संघटनांनी आवाज उठवला होता. यावर सार्वजनिक बांधकाम खात्याने सुळगा हिं. येथून (केंबाळी नाला)पासून रस्त्याच्या डांबरीकरणाला बुधवार दि. 27 नोव्हेंबरपासून सुऊवात केली आहे. केंबाळी नाला, सुळगा ते बाची या जवळपास दहा किलोमीटर अंतराच्या पट्ट्यातील रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच या खड्ड्यांतून खडी, बोर्डर टाकून बुजविण्यात आले होते. सदर खडी पुन्हा रस्त्यावरती विखुरलेले होते. मात्र बुधवारी दुपारपासून या रस्त्याच्या डांबरीकरणाला सुऊवात करण्यात आली आहे. जिथे रस्ता अत्यंत खराब आहे अशा खराब रस्त्यातील खड्डे बुजविणे आणि त्याच्यावर डांबरीकरण करणे याला प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र रस्त्याची ऊंदी अथवा पक्का रस्ता कधी होणार, हे अद्यापही प्रवासी आणि नागरिकांना समजत नसल्याने याचा गुंता कधी सुटणार? याबाबत अद्यापही संशयाच्या भोवऱ्यात या भागातील नागरिक असल्याचे चित्र आहे.

Advertisement

रुंदीकरण-दुपदरीकरण आवश्यक

या संपूर्ण रस्त्याची दुर्दशा पाहता या रस्त्याचे काम लवकरात लवकर हाती घेऊन रस्त्याची ऊंदी वाढविणे, दुपदरीकरण करणे हे अतिशय गरजेचे आहे. मार्च, एप्रिल, मे या महिन्याच्या अगोदर सदर रस्ता पूर्ण झाला तरच नागरिकांना येत्या पावसाळ्यात रस्त्यावरून वाहतूक करणे सोपे जाईल. अन्यथा येरे माझ्या मागल्या म्हणण्याची वेळ या प्रवासीवर्गांवर पुढेही येतच राहणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने या कामाची तातडीने पूर्तता करावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांतून करण्यात येत आहे.

रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षतोडीचे काम संथगतीने

या भागातील रस्त्याच्या दुतर्फा असलेले मोठमोठे वृक्ष तोडण्याला सुऊवात करण्यात आली आहे. मात्र हे काम चालू होऊन आज पंधरा-वीस दिवस होत आले. हे काम संथगतीने चालू असल्याने रस्ताकाम येत्या पावसाळ्याच्या अगोदर तरी पूर्ण होईल का? अशी शंका प्रवाशांतून व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.