For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अतिवाड क्रॉस-महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा

10:33 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
अतिवाड क्रॉस महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा
Advertisement

केवळ एक कि. मी. रस्त्याच्या दुरुस्तीकडे कर्नाटक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

Advertisement

वार्ताहर /उचगाव

उचगाव-कोवाड मार्गावरील अतिवाड क्रॉस ते कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली असून संपूर्ण रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांनी हा रस्ता विखुरल्याने या रस्त्याची चाळण झाली आहे. सदर रस्त्याची तातडीने दुऊस्ती करावी, अशी मागणी या भागातील प्रवासी आणि नागरिकांनी केली आहे. उचगाव-कोवाड हा महामार्ग कर्नाटक आणि महाराष्ट्रात या दोन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचा महत्त्वाचा मार्ग आहे. बेळगाव तसेच शिनोळी, बेळगुंदी, उचगाव अशा अनेक भागातील प्रवासी आणि महाराष्ट्र हद्दीतील कागणी, कोवाड ते थेट नेसरी, आजरा, गडहिंग्लज, कोल्हापूर अशा भागात प्रवाशांची सातत्याने या रस्त्यावरून वर्दळ असते. उचगाव ते अतिवाड क्रॉसपर्यंतचा रस्ता कर्नाटक शासनाने डांबरीकरणाचे काम पूर्ण केले आहे. तसेच कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीपासून महाराष्ट्रात जाणारा गडहिंग्लजपर्यंतचा संपूर्ण रस्ता हा अतिशय चांगल्या प्रतीचा आहे. मात्र अतिवाड क्रॉस ते महाराष्ट्र हद्दीपर्यंतचा अवघा एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याचीच मात्र दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर अनेक ख•s असल्याने यातून रस्ता शोधण्याची वेळ प्रवासी वर्गावर आली आहे. सध्या झालेल्या वळीव पावसामुळे या रस्त्यावरील खड्ड्यांतून पाणी साचून याचा नाहक त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. रात्रीच्या अंधारातून वाहन चालवणे म्हणजे जीवावर बेतण्याचेच प्रसंग प्रवासी वर्गावर असतात. यासाठी तातडीने सार्वजनिक बांधकाम खात्याने पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांची डागडुजी करून एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करण्यात यावे, अशी जोरदार मागणी या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या कर्नाटक-महाराष्ट्र या राज्यातील प्रवासीवर्ग आणि नागरिकांनी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.